उद्रेक न्युज वृत्त
ब्रम्हपुरी(चंद्रपूर) :- सध्याच्या घडीला उष्णतेमुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा कहर जाणवू लागला आहे.अशातच आज,दिनांक- २७ मे २०२४ रोजी चंद्रपूर जिल्ह्यतील ब्रम्हपुरी शहरामध्ये ४७.१ अंश तापमानाची उच्चांकी नोंद झाली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहर हे विदर्भातील सर्वाधिक उष्णतेचे शहर ठरले आहे.ब्रम्हपुरी शहरात आज ४७.१ अंश तापमनाची नोंद करण्यात आली आहे.ब्रम्हपुरी विदर्भातील सर्वाधिक उष्णतेचे शहर ठरले.तर दुसरीकडे चंद्रपूर शहरामध्ये ४४.८ अंश तापमान नोंदवले गेले.या दोन्ही शहरातील तापमानांचा विचार केला तर,चंद्रपूर आणि ब्रम्हपुरी या दोन्ही शहरांचे आजचे तापमान या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान ठरले.या भयंकर उष्णतेमुळे शहरातील नागरिकांना प्रचंड गर्मीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.ब्रम्हपुरी शहरही चांगलेच तापत आहे. येत्या ३१ मे पर्यंत हिटवेव अशीच कायम राहणार असल्याने जिल्ह्यातील सर्व नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

