Thursday, July 16, 2026
Homeकुरखेडाकुरखेडा 'संस्कार पब्लिक स्कूल' दहावीचा निकाल शंभर टक्के…-उज्वल निकालाची परंपरा आजही कायम…

कुरखेडा ‘संस्कार पब्लिक स्कूल’ दहावीचा निकाल शंभर टक्के…-उज्वल निकालाची परंपरा आजही कायम…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कुरखेडा(गडचिरोली) :-आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था कुरखेडा द्वारा संचालित ‘संस्कार पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज’ कुरखेडा यांनी आपल्या उज्वल निकालाची परंपरा आजही कायम ठेवली आहे.कुरखेडा येथील संस्कार पब्लिक स्कूल  दहावी वर्गाचा निकाल शंभर टक्के टक्के लागलेला असल्याने शाळेने निकालाची परंपरा मागील ४ वर्षांपासून कायम राखली आहे. 

संस्कार पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कुरखेडा येथील विद्यार्थी काव्य जागेश्वर सोरते याने ८९.४० टक्के प्राप्त करीत शाळेमधून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.तर श्रुती विजय गजभिये हिने ८८.२० टक्के प्राप्त करीत शाळेतून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.तर प्रिनल बाळकृष्ण बोरकर हिने ८६.४० टक्के मिळविले असून शाळेतून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.तसेच आयुष चौधरी ८६.२० टक्के,सम्यक सहारे ८६ टक्के,विधी बंसोड ८३.६० टक्के,अंश मेश्राम ८२ टक्के, अल्फोंसा नैताम ८२ टक्के, प्रांजल काचीनवार ८०टक्के,गुंजन राऊत ७९.८०टक्के, सिद्धार्थ शेंडे ७८.४० टक्के,विष्णू उईके ७६.८० टक्के,शाळेतील विद्यार्थ्यांनी ७५ टक्के पेक्षा जास्त टक्के प्राप्त करून शाळेचा नाव लौकिक केला.

यावेळी आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे पदाधिकारी शाळेचे प्राचार्य व शिक्षकाचे उत्कृष्ट मार्गदर्शन,शाळेत होणारे नियमित वर्ग,नियमित चाचण्या,शाळेत मिळणाऱ्या विविध सोयी सुविधा,  शाळेतील मोफत वायफाय यामुळेच हे यश प्राप्त करता आले; असे गुणवंत विद्यार्थ्यांनी सांगितले आहे .

या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे प्राचार्य देवेंद्र फाये,बी.के.दाऊदसरिया,आर.जे.पवार, एम.जी.वाईकर, एम.आर.ठाकूर,एन.के.निरंकारी, एच. एम. मुसानी यांना दिलेले आहे.या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मोहन अरमरकर,संस्था कोषाध्यक्ष वामनराव फाये, संस्था सचिव दोषहरराव फाये,उपाध्यक्ष गजानन येलतुरे,संस्था सहसचिव प्रा.नागेश्वर फाये,संस्था सदस्य इंजि.गुणवंत फाये,शाळा समिती सदस्य चांगदेव फाये, संस्था सदस्य हुंडीराज फाये,विमलताई फाये,वर्षाताई फाये,शाळेचे प्राचार्य देवेंद्र फाये व संस्थेचे सर्व कार्यकारणी मंडळ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी केलेले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गुरुजींची डोकेदुखी वाढली; विविध जबाबदारीचे ओझे लादून गुणवत्तेची अपेक्षा.. -पाणी डोक्याच्यावर गेल्यास काय खाक गुणवत्ता वाढणार?

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली शिक्षकांची अवस्था "ना घर के ना घाट के" अश्या प्रकारची झाली आहे.एक काळ होता जेव्हा शिक्षकाच्या हातात खड्डू आणि पुस्तक...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय मुंबई येथे मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र...

अखेर प्रतीक्षा संपली; लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपली असून मागील महिन्याच्या दीड हजाराची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.जून महिना संपून जुलै...

बांधकाम कामगारांसाठी मोठा निर्णय; कामगारांना मिळणाऱ्या लाभ रकमेत वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मंडळाच्या चार प्रमुख कल्याणकारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!