Friday, September 25, 2026
Homeछत्रपती संभाजी नगरमोबाईल टॉवर उभारण्यासाठी नियमबाह्य परवानगी देणे ग्रामपंचायतीला चांगलेच भोवले…- सरपंच, उपसरपंचासह १७...

मोबाईल टॉवर उभारण्यासाठी नियमबाह्य परवानगी देणे ग्रामपंचायतीला चांगलेच भोवले…- सरपंच, उपसरपंचासह १७ सदस्य अपात्र..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

छत्रपती संभाजीनगर :- जिल्ह्यातील वाळूज ग्रामपंचायतीला खाजगी कंपनीला मोबाईल टॉवर उभारण्यासाठी नियमबाह्य परवानगी दिल्याचे प्रकरण चांगलेच भोवले आहे.नियमबाह्य परवानगीमुळे अख्खी ग्रामपंचायतच विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांच्या आदेशाने अपात्र ठरविण्यात आली आहे.सरपंच,उपसरपंच यांच्यासह १७ सदस्यांचा यात समावेश आहे.

जिओ डिजिटल फायबर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने दोन वर्षांपूर्वी वाळूजला फायबर केबल व नवीन मोबाईल टॉवर उभरण्यासाठी ग्रामपंचायतीकडे ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल केला होता.त्या नंतर ग्रामपंचायतने कंपनीला टॉवर उभारण्याची परवानगी दिली.या विरोधात रहिवासी भैय्यासाहेब चव्हाण यांनी शाळेपासून शंभर मीटरच्या अंतरावर टॉवर उभरण्यास परवानगी देताना ग्रामपंचायतीने कोणताही ठराव घेतला नाही; अशी तक्रार विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांच्याकडे केली होती.विभागीय आयुक्तांनी सरपंच उपसरपंच यांच्यासह १७ सदस्यांना अपात्रतेची कारवाई केली तसेच ग्रामसेवक यांच्या शिस्तभंगाची कारवाई केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा फटका..! भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद; ६३ गावांचा तुटला संपर्क..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या विविध भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे.अश्यातच जिल्ह्यातील पर्लकोटा नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली...

जुनी वडसा येथे झुडपी जंगलातील वनपट्ट्यांबाबत सभापती सचिन खरकाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषद हद्दीतील जुनी वडसा येथील झुडपी जंगल परिसरावर वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या आणि शेती कसत असलेल्या नागरिकांना वनजमिनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी...

शिधापत्रिकाधारकांनी १५ दिवसांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना धान्याचा लाभ नियमितपणे मिळावा आणि शिधापत्रिकेवरील सदस्यांची माहिती अचूक व अद्ययावत राहावी,यासाठी गडचिरोली तालुक्यात ई-केवायसी प्रक्रिया...

“आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही; मला माफ करा” अशी चिठ्ठी लिहून वकिलाने घेतला गळफास.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुण वकिलाने गळफास घेण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली.त्यात "आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही,मला माफ करा.माझ्या बहिणीकडे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!