Thursday, September 24, 2026
Homeमूलडोक्यावर अंडे फोडून अश्लील हावभाव करणारा तालुका कृषी अधिकारी अजूनही मोकाटच…

डोक्यावर अंडे फोडून अश्लील हावभाव करणारा तालुका कृषी अधिकारी अजूनही मोकाटच…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मूल(चंद्रपूर) :- मूल येथील तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे याच्या वागणुकीला कंटाळून त्याच कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याने पोलिसात विनयभंगाची तक्रार दाखल केली.संबंधित अधिकाऱ्यावर कलम ३५४,३५४ (अ) अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला.मात्र तीन दिवसाचा कालावधी लोटूनही अटक का झाली नाही? असा प्रश्न पीडित महिला कर्मचाऱ्याने विचारला आहे.

तीन वर्षापूर्वी प्रशांत कासराळे हेच तालुका कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होते.त्याच कार्यालयातील एका कृषी सहायकाने,कृषी सहायक महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली होती.विनयभंगाच्या गुन्ह्याखाली कृषी सहायकावर तातडीने कारवाई झाली होती.तालुका कृषी अधिकाऱ्याच्या विचित्र वागणुकीला कंटाळून महिला कर्मचाऱ्याने पोलिस स्टेशनला विनयभंगाची तक्रार केली.काही वर्षांपासून प्रशांत कासराळे तालुका कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहे.मागील काही महिन्यांपासून वाईट नजरेने बघत जाणून-बुजून स्पर्श करणे,सुटीच्या दिवशी एकटीलाच कार्यालयात बोलविणे,असे प्रकार करीत असल्याचे तसेच २६ मार्चला दुपारी २ वाजेच्या सुमारास रंगपंचमी असल्याने जोरजबरजस्तीने डोक्यावर अंडे फोडून अश्लील हावभाव केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.कृषी अधिकाऱ्यांच्या अशा विचित्र वागणुकीमुळे त्रासलेल्या महिला कर्मचाऱ्याने जिल्ह्यातील वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार दाखल केली.मात्र,वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.अशातच आता विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊन तीन दिवसांचा कालावधी झाला.पण आरोपीला अटक का झाली नाही? असा प्रश्न पीडित महिलेने विचारला आहे.

सुमित परतेकी,ठाणेदार मूल👇

महिलेच्या तक्रारीनुसार आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.या प्रकरणाचा तपास सुरूच आहे. साक्षीदाराचे बयाण नोंदविल्यानंतर आरोपीवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर लाडक्या बहिणींचा ऑगस्ट महिन्याचा मार्ग मोकळा; खात्यात येणार दीड हजार..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या प्रलंबित हप्त्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.विशेष म्हणजे,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी...

पुढील तीन तासात दोन जिल्ह्यात बरसणार जोरदार पाऊस; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-उघडीप देणारा पाऊस कुठे जोरदार पडतो,तर कुठे एक थेंबही पडत नाही.निसर्गाचा लहरीपणा या वर्षी चांगलाच धडा शिकवायला लागल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे,काही...

निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन; डीजे मालक व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल.. – डीजे सह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा पवनपार येथील नवयुवक बाल गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रेशर मिड(Pressure...

डुंबरसात्या आणण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गावालगतच्या जंगल परिसरात 'डुंबरसात्या' म्हणजेच मशरूम आणण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार २४ सप्टेंबर रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!