उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :- दोन पैसे व्याज मिळेल या अपेक्षेपोटी पोस्टामध्ये पैसे ठेवणाऱ्या १८ ग्राहकांचे सहा लाख रुपये हडपणाऱ्या डाकपालावर १७ मे रोजी शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.त्याला दोन दिवसांपूर्वी शहर पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आज सोमवारपर्यंत (दि.२०) पोलिस कोठडी सुनावली आहे.गोंदिया खुर्द येथे पोस्टाचे डाकघर आहे.या शाखेत आरोपी नितीन सदाराम राऊत वय २८ वर्षे, रा.डोंगरगाव हा कार्यरत असता त्याने १२ मे २०२० ते ७ जानेवारी २०२३ या काळात १८ ग्राहकांचे सहा लाख दोन हजार रुपये शासकीय हिशेबात जमा न करता त्या पैशांची अफरातफर केली होती.या घटने संदर्भात डाक विभागाचे उप अधीक्षक आशिष बन्सोड वय ४१ वर्षे रा. समता कॉलनी,ब्रह्मपुरी यांच्या तक्रारीवरून १७ मे रोजी शहर पोलिसांनी भादंवि कलम ४०९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.त्या अफरातफर करणाऱ्या डाकपाल नितीन राऊत याला शहर पोलिसांनी दोन दिवसांनी मुंबईच्या कुलाबा येथून अटक केली.त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला आज सोमवारपर्यंत (दि.२० मे) पोलिस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा,उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनात शहर ठाणेदार चंद्रकांत सूर्यवंशी, उपनिरीक्षक मंगेश वानखडे, हवालदार दीपक राहांगडाले, श्यामकुमार कोरे, शिपाई कुणाल बारेवार, भांडारकर यांनी केली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक मंगेश वानखडे करीत आहेत.

