Sunday, May 3, 2026
Homeनागपूरनागपूर उत्पादन शुल्क विभागातील लाच घेणाऱ्या कोकरे कडे सापडली ६६ हजारांची दारू

नागपूर उत्पादन शुल्क विभागातील लाच घेणाऱ्या कोकरे कडे सापडली ६६ हजारांची दारू

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- बिअर बारच्या परवान्याची फाइल मंजूर करण्याच्या बदल्यात ३.२५ लाख रुपयांची लाच घेतल्या प्रकरणात उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक रवींद्र कोकरेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून २० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.पोलिसांनी कोकरेच्या घराची झडती घेतली असता,तेथून ६६ हजारांची दारू जप्त करण्यात आली.या प्रकरणात देखील कोकरेविरोधात सीताबर्डी पोलिस ठाण्यात दारुबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळमेश्वर येथील रेस्टॉरंट चालकाकडून रवींद्र कोकरे ३.२५ लाखांची लाच घेताना कोकरेला ‘एसीबी’च्या पथकाने गुरुवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केली. कोकरेने चार लाख रुपये मागितले होते व त्यानंतर सव्वातीन लाखांत काम करण्यास तो तयार झाला होता.

कोकरे मुळचा पुण्याचा असून ट्रॅफिक पार्कजवळच त्याचे निवास आहे. कोकरेला रंगेहात पकडल्यानंतर पोलिसांनी घराची झडती घेतली.तेथे ब्रँडेड दारूच्या ३० बाटल्या सापडल्या.याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली त्याआधारे कोकरेविरुद्ध सीताबर्डी पोलिस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,कोकरेने अवैध मार्गाने कोट्यवधींची संपत्ती कमावली आहे.ही मालमत्ता विश्वासू लोकांच्या नावावर आहे.’एसीबी’ कोकरेच्या घरातून सापडलेल्या कागदपत्रांची तपासणी करून सत्य शोधत आहे.३.२५ लाख रुपयांच्या लाचेत उत्पादन शुल्क विभागाच्या अन्य अधिकाऱ्यांचाही वाटा होता का? याची चौकशी सुरू आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

२४ वर्षीय तरुणाचा आढळला मृतदेह; गडचिरोली शहरात खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-एका २४ वर्षीय तरुणाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने गडचिरोली शहरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना गडचिरोली शहराच्या धानोरा मार्गावरील शिवाजी...

आता कुरखेडा व परिसरातील मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांना वेळेवर व दर्जेदार मिळणार उपचार.. “महाडायलिसिस” अंतर्गत कुरखेडा येथे अत्याधुनिक डायलिसिस केंद्राचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक आरोग्य विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या “महाडायलिसिस-स्वस्थ आरोग्याची हमी” या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक डायलिसिस केंद्राचे लोकार्पण उत्साहात पार पडले.या...

अचानकपणे रानडुकरांचा कळप मार्गावर आला; धाडकन दोन दुचाक्या धडकल्या.. – तिघेजण गंभीर जखमी,तर एकजण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दुचाकीने निघालेल्या गावापासून काही अंतरावरील मार्गावर अचानकपणे रानडुकरांचा कळप आडवा आल्याने झालेल्या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले,तर एकजण किरकोळ जखमी झाल्याची...

सौर विद्युत कुंपण योजना ही शेतकऱ्यांच्या हिताचीच; उधळपट्टीचे आरोप निराधार- कृषी विभागाचे स्पष्टीकरण

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतून राबविण्यात येत असलेल्या सौर विद्युत कुंपण योजनेबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांतील आरोप वस्तुस्थितीला धरून नसून दिशाभूल करणारे आहेत.ही...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!