Thursday, April 30, 2026
Homeगडचिरोलीनाट्यश्री कविता स्पर्धेतील एकोणिसाव्या सत्रात पत्रू हनुमंतू गोरंतवार (सुरज) विजयी

नाट्यश्री कविता स्पर्धेतील एकोणिसाव्या सत्रात पत्रू हनुमंतू गोरंतवार (सुरज) विजयी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली’ च्या वतीने “आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता” हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते. या कवितेला “आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी” म्हणून पुरस्कृत करण्यात येते.व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते. 

या उपक्रमाचे एकोणविसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात २५ कवींनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील कवी पत्रू हनुमंतू गोरंतवार यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या ” प्रारंभ” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे.असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 

पत्रू हनुमंत गोरंतवार हे पोंभुर्णा (जिल्हा- चंद्रपूर) येथील रहिवासी असून १०० च्या वर कवितांचे लेखन त्यांनी केलेले आहे.त्यांचे नविन कविता संग्रह प्रकाशनाचे मार्गावर असून नुकत्याच प्रकाशित झालेल्या “रानगर्भ फुलत आहे” या प्रातिनिधिक कविता संग्रहात त्यांच्या दोन कविता प्रकाशित झालेल्या आहेत.अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने ते सन्मानित असून सातत्याने कविता लेखनाचे  कार्य करीत आहे.त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे दादा चुधरी,दिलीप मेश्राम,प्रा.यादव गहाणे व प्रा.अरुण बुरे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

या एकोणिसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने जयराम घोंगडे,संतोष कपाले,वंदना सोरते,सुरज गोरंतवार, राहूल शेंडे,वसंत चापले,भिमानंद मेश्राम,हरिष नैताम, स्वप्नील बांबोळे,नरेंद्र गुंडेली, डॉ. चंद्रकांत लेनगुरे, जितू निलेकार,मारोती आरेवार,गणेश रामदास निकम, तुळशीराम उंदीरवाडे,चरणदास वैरागडे,पुरुषोत्तम दहिकर,विलास जेंगठे,मिलींद खोब्रागडे, खुशाल म्हशाखेत्री,रेखा दिक्षित,डॉ.मंदा पडवेकर, सुजाता अवचट, मुर्लीधर खोटेले,पी.डी.काटकर इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

    – चुडाराम बल्हारपुरे (नाटककार)

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नक्षलमुक्तीचा ठेवा..! स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७ वर्षात प्रथमच जिल्हाधिकारी गडचिरोलीच्या दुर्गम भागात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या टोकावर वसलेल्या व छत्तीसगडच्या सीमेवरील अत्यंत दुर्गम व नक्षल प्रभावित भामरागड तालुक्याच्या बीनागुंडा आणि लाहेरी या भागात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७...

पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘जीवनदायिनी’.. गडचिरोली जिल्ह्यात ३१ रुग्णांना तब्बल ३१ लाख ३५ हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे.गडचिरोली जिल्ह्यात आर्थिक वर्षात...

पोटात दुखू लागल्याने झाला भांडाफोड; अल्पवयीन विद्यार्थिनी आठ महिन्यांची गर्भवती.. – तरुणावर अत्याचार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वयात आल्यानंतर मुला-मुलींमध्ये एकमेकांविषयी आकर्षण वाढते आणि तिथूनच पुढे सुरू होतेय अनोखी 'लव्हस्टोरी' ही काही सांगण्याची गरज नाही.पण,अल्पवयीनांची 'लव्हस्टोरी' चिरकाल टिकणारी...

आता ‘त्या’ आमदार अन् खासदारांना उठून अभिवादन करण्याची गरज नाही..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील कित्येक आमदार आणि खासदारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. अश्यातच काहीजणांवर फौजदारी कारवाई झालेली वा इतर प्रकरणात दोषी ठरलेले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!