Friday, August 7, 2026
Homeनवी दिल्लीअरविंद केजरीवालांनी जनतेला दिल्या १० गॅरंटी...- देशात २४ तास विजेची व्यवस्था;गरिबांना मोफत वीज;...

अरविंद केजरीवालांनी जनतेला दिल्या १० गॅरंटी…- देशात २४ तास विजेची व्यवस्था;गरिबांना मोफत वीज; शेतमालाला हमीभाव व इतर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नवी दिल्ली :-दिल्लीतील सत्ताधारी पक्ष आम आदमी पार्टीने आज रविवारी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकावर जोरदार हल्ला चढवला.आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

मोदींनी दिलेल्या जुन्या आश्वासनांवर जोर देत

केजरीवाल म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात

१५ लाख टाकणार होते,पण तसे झाले नाही.२ कोटी

रोजगार देणार होते,पण तसेही झाली नाही.२०२२

पर्यंत बुलेट ट्रेन चालवण्याच्या बाता मारत होते, पण

अद्याप तसे झालेले नाही. मात्र आम्ही मोफत वीज,

चांगले शिक्षण, मोहल्ला क्लिनीकचे आश्वासन दिले

आणि पूर्णही केले. मोदींची गॅरंटी कोण पूर्ण करणार

माहिती नाही.कारण ते आता ७५ वर्षांचे होणार

असून त्यांनीच बनवलेल्या नियमाप्रमाणे निवृत्त

होतील.परंतु केजरीवाल यांची गॅरंटी केजरीवालच

पूर्ण करेल.एखाद्या देशामध्ये लाखो लोकं अशिक्षित असतील,शिक्षण व्यवस्था चांगली नसेल तर देशाचा विकास होणारच नाही.देशातील जनतेचे आरोग्य चांगले राहिले तरच देशाचा विकास होईल.आज देशातील सरकारी रुग्णालयांची परिस्थिती बिकट आहे.त्यामुळे देशात प्रत्येक गल्लीत मोहल्ला क्लिनिक

सुरू केले जाईल,असे म्हणत केजरीवाल यांनी देशाला १० आश्वासने दिली.

१. देशात २४ तास विजेची व्यवस्था करणार आणि गरिबांना मोफत वीज देणार

२. प्रत्येक गावात, मोहल्ल्यात चांगल्या शाळा उभारणार.देशात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाला चांगले आणि मोफत शिक्षण मिळण्याची व्यवस्था करणार

३. प्रत्येक गावात,गल्लीत मोहल्ला क्लिनीक उघडणार. प्रत्येक जिल्ह्यात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार

४. राष्ट्र सर्वप्रथम – लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य देणार आणि चीनच्या ताब्यात गेलेली जमीन सोडवणार

५. अग्निवीर योजना लष्करासाठी घातक असून ही योजना बंद करणार. अग्निवीर योजनेद्वारे भरती झालेल्यांना पक्की नोकरी देणार

६. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार शेतमालाला हमीभाव देणार

७. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देणार

८. एका वर्षात दोन कोटी रोजगार देण्याची व्यवस्था करणार

९. भाजपच्या वाशिंग मशीनला भर चौकात फोडणार आणि देशाला भ्रष्टाचारमुक्त करणार

१०. व्यापाऱ्यांसाठी जीएसटी प्रणाली अधिक सुकर करणार

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

गडचिरोली जिल्ह्यात अग्निवीर भरतीसाठी तब्बल सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारतीय सैन्यातील अग्निवीर भरती प्रक्रियेबाबत जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींना सविस्तर माहिती व मार्गदर्शन मिळावे,यासाठी गडचिरोली जिल्ह्यात येत्या,सोमवार १० ते १२ ऑगस्ट २०२६...

सात हजाराची लाच भोवली; महिला ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत तब्बल सात हजाराची लाच घेतांना एका महिला ग्रामसेविकेस रंगेहाथ पकडले.रंजू...

राज्यातील ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांना ५ हजार २९ कोटींच्या कर्जमुक्ती लाभाचे वितरण.. – आज गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांसाठी बँकांना रक्कम...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांसाठी १५ कोटी १८ लाख ७२ हजार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!