Friday, May 1, 2026
Homeनागपूरअवैध रेती वाहतूक करायची असल्यास २५ हजार रुपयांची मागणी करणाऱ्या दोन पोलिसांना...

अवैध रेती वाहतूक करायची असल्यास २५ हजार रुपयांची मागणी करणाऱ्या दोन पोलिसांना कारावास

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- विशेष सत्र न्यायालयाने २५ हजार रुपयांची लाच घेणारे सहायक पोलिस उपनिरीक्षक हरिश्चंद्र रामराव बामनोटे वय ५९ वर्षे यांना चार वर्षे सश्रम कारावास व ५० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दहा महिने अतिरिक्त कारावास तर, पोलिस वाहन चालक राजू शालिकराम आवजे वय ५५ वर्षे यांना तीन वर्षे सश्रम कारावास व २० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास,अशी शिक्षा सुनावली.न्यायाधीश राहुल भोसले यांनी हा निर्णय दिला.

घटनेच्या वेळी हे पोलिस कर्मचारी रामटेक येथे कार्यरत होते.फिर्यादी सीताराम रामटेकजवळच्या नदीतील रेतीची ट्रॅक्टर व ट्रॉलीने अवैध वाहतूक करीत होते.संबंधित रेती घाटाचा लिलाव झाला नव्हता. दरम्यान,रामटेक पोलिसांनी सीताराम यांच्याविरुद्ध रेती चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांचा ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केली.काही दिवसांनी बामनोटे यांनी सीतारामला बोलावून घेतले व अवैध रेती वाहतूक करायची असल्यास २५ हजार देण्याची मागणी केली.त्यामुळे सीतारामने नागपूरमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार केली.या विभागाने १५ एप्रिल २०१९ रोजी सापळा रचून बामनोटे यांना २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.या गुन्ह्यात आवजेदेखील सामील होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन उत्साहात साजरा.. महाराष्ट्र दिनी “समृद्ध गडचिरोली” घडविण्याचा संकल्प..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प व्यक्त करत विकास, शांतता...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!