Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीनागरिकांचा लोकशाहीवरील विश्वास प्रेरणादायी…-जिल्हाधिकारी संजय दैने -गडचिरोली येथे महाराष्ट्र स्थापना दिन साजरा…

नागरिकांचा लोकशाहीवरील विश्वास प्रेरणादायी…-जिल्हाधिकारी संजय दैने -गडचिरोली येथे महाराष्ट्र स्थापना दिन साजरा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- लोकसभा निवडणूकीत गडचिरोलीचे विक्रमी ७२ टक्के मतदान हे जिल्ह्यातील नागरिकांचा लोकशाहीवर दृढ विश्वास दर्शवित असून गडचिरोलीकरांचा प्रतिकूल परिस्थितीतही मतदानाप्रती असलेला दृढ संकल्प देशभरातील नागरिकांना लोकशाहीची भावना जपण्यासाठी प्रेरणा देणारा ठरेल; असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६४ वा वर्धापन दिन आज दिनांक -१ मे रोजी जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला.यावेळी मार्गदर्शन करतांना दैने बोलत होते.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह,जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल,सहायक जिल्हाधिकारी राहुल मिना,उपवनसंरक्षक मितेश शर्मा याप्रसंगी उपस्थित होते.

संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना तसेच जिल्ह्यातील शहिदांच्या पावन स्मृतीस जिल्हाधिकारी यांनी अभिवादन केले.तसेच शहीदांचे कुटूंबिय, स्वातंत्र्यसेनानी,लोकप्रतिनिधी,प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी,शेतकरी-बांधव,ज्येष्ठ नागरिक,सर्व जिल्हावासी आणि पत्रकार यांना महाराष्ट्र राज्याचा वर्धापन दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

याप्रसंगी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या हस्ते उत्कृष्ठ कामगिरी बजावलेले आमगावचे तलाठी कोंडीबा चाटे,पोलिस उपनिरीक्षक नथ्याबा बोडरे,पोलिस नायक रावजी हिचामी,रूषी विडपी, रुपेश म्हशाखेत्री यांचा सत्कार करण्यात आला.  सुरवातीला परेड कमांडर धर्मेंद्र मडावी व सेकंड कमांडर सुरेश मडावी यांच्या नेतृत्वात पथसंचलन करण्यात आले.कमांडो सी-६०,महिला पोलिस, पोलिस मुख्यालय, गृहरक्षक दल, बँड, डॉग स्कॉड, बिडीडीएम आदि पथकांनी संचलन करून मानवंदना दिली.  

यावेळी अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता,अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील,जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी एस.आर.टेंभुर्णे यांचेसह जिल्हा व पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!