Sunday, September 6, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात १२ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल-आज ८ उमेदवारांनी भरले अर्ज…उमेदवारांची नावे...

गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात १२ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल-आज ८ उमेदवारांनी भरले अर्ज…उमेदवारांची नावे बघा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

गडचिरोली :- सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-२०२४ अंतर्गत गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी ८ उमेदवारांनी  अर्ज दाखल केल्याने उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची एकूण संख्या १२ झाली आहे.

यामध्ये डॉ.नामदेव दसाराम किरसान (इंडियन नॅशनल काँग्रेस),धीरज पुरूषोत्तम शेडमागे (जनसेवा गोंडवाना पार्टी), मिलींद रामजी नरोटे (भारतीय जनता पार्टी), हितेश पांडूरंग मडावी (वंचित बहुजन आघाडी), योगेश नामदेव गोन्नाडे(बहुजन समाज पार्टी), करण सुरेश सयाम (अपक्ष), सुहास उमेश कुमरे (भीमसेना), विलास शामराव कोडापे (अपक्ष) या आठ उमेदवारांनी आज नामनिर्देशनपत्र दाखल केले. तर यापुर्वी अशोक महादेवराव नेते (भारतीय जनता पार्टी), बारीकराव धर्माजी मडावी (बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पक्ष), हरिदास डोमाजी बारेकर (अपक्ष) व विनोद गुरूदास मडावी (बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पक्ष) या चार उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. उमेदवारी दाखल करण्यासाठी इच्छुकांमार्फत शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ९९ नामनिर्देशन अर्ज खरेदी करण्यात आले होते. 

२८ मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे.३० मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!