Sunday, May 3, 2026
Homeगडचिरोलीट्रॉफीकवाले साहेब….आता तुम्हीच सांगा; सकाळ पासून अनेकांच्या घश्यात उतरतोय की, नाही दारूचा...

ट्रॉफीकवाले साहेब….आता तुम्हीच सांगा; सकाळ पासून अनेकांच्या घश्यात उतरतोय की, नाही दारूचा घोट…!-किती जणांच्या ‘एम एल सी’ करताय राव?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

गडचिरोली :- किती हास्यास्पद म्हणावे; ‘तो’ स्वतः  व  ७०० रुपये ते ८०० रुपये रोजीचा कार्यकर्ता घेऊन दिवसभर अनेकांकडून केव्हा २०० तर केव्हा ५०० रुपये तसेच इतर रक्कम वसूल करूनही ‘तो’ मी नव्हेच अशी भूमिका बजावत असल्याने याचे नवल वाटत आहे.अशातच सकाळ पासून अनेकांच्या घश्यात उतरतोय दारूचा घोट..तरी ‘तो’ ट्रॉफीकवाला साहेब म्हणतोय पिणाऱ्या व्यक्तीची  ‘एम एल सी’ करावी लागणार? किती जणांच्या ‘एम एल सी’ करताय राव? सकाळ पासून ते रात्रौ झोपेपर्यंत जनतेसाठी झटणारे एका विभागाचे तथाकथित कार्यकर्ते धुंदीत असतात.अनेकांना याबाबतीत माहिती आहे; मात्र अनेकजण घाबरून झाकली मूठ सव्वा लाखाची करीत असतात.गडचिरोली जिल्ह्यातील एका ‘त्या’ पोलीस ठाण्याजवळच एका पाणठेल्यात विदेशी दारूचा महापूर वाढला असून एका विभागातील कार्यकर्ते सकाळ पासूनचा ठरलेला वेळ तसेच सायंकाळचा ठरलेला वेळ ठरवून विदेशी दारू पिऊन झांगडगुत्ता करीत असतात.हे कुणालाही दिसत नाही कां?जनतेची कामे करण्यासाठी दारू पिऊन खुर्चीवर बसणारा त्याला साधा धड बोलताही येत नाही तसेच उलट मी पिऊन आहे ; असे छाती ठोक पणे सांगतो; त्याचीच बाजू घेतली जाते; ही शोकांतिका आहे.अशांची ‘एम एल सी’ कां नाही? याबाबत वरिष्ठांना पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. मात्र ‘तो’ ट्रॉफीकवाला साहेब अनेकांचे बचाव कार्य करून वसुलीचे सत्र तर राबवित नाही ना? अशी शंका बळावली आहे

मात्र इतरांना दारू पिऊन आल्या बद्दल  ‘एम एल सी’ करण्याची धमकी वजा बोलणी करतो आहे. नेमकी  ‘एम एल सी’ म्हणजे काय? ‘त्या’ कार्यकर्त्याला कळले की,काय? हे ….समजणे तितकेच महत्त्वाचे आहे.एखादा व्यक्ती अरे रावीची भाषा वापरीत नसेल तरी सुद्धा आपल्या पदाचा रोप झाडून दाबण्याचा प्रयत्न करणे हे कितपत योग्य आहे.नाहीतर उगीचच पोमाडेंगी; असे व्हायला नको? याबाबत कित्येकजण सुज्ञ तसेच कित्येकजण पॉश प्रणाली वापरून आपला बोलबाला करीत आहेत; हे माहिती अधिकार कायदा २००५ अन्वये ‘एक अर्ज एक विषय ‘ यानुसार माहिती मागविण्यात येणार असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ता सत्यवान रामटेके यांनी म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

२४ वर्षीय तरुणाचा आढळला मृतदेह; गडचिरोली शहरात खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-एका २४ वर्षीय तरुणाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने गडचिरोली शहरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना गडचिरोली शहराच्या धानोरा मार्गावरील शिवाजी...

आता कुरखेडा व परिसरातील मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांना वेळेवर व दर्जेदार मिळणार उपचार.. “महाडायलिसिस” अंतर्गत कुरखेडा येथे अत्याधुनिक डायलिसिस केंद्राचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक आरोग्य विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या “महाडायलिसिस-स्वस्थ आरोग्याची हमी” या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक डायलिसिस केंद्राचे लोकार्पण उत्साहात पार पडले.या...

अचानकपणे रानडुकरांचा कळप मार्गावर आला; धाडकन दोन दुचाक्या धडकल्या.. – तिघेजण गंभीर जखमी,तर एकजण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दुचाकीने निघालेल्या गावापासून काही अंतरावरील मार्गावर अचानकपणे रानडुकरांचा कळप आडवा आल्याने झालेल्या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले,तर एकजण किरकोळ जखमी झाल्याची...

सौर विद्युत कुंपण योजना ही शेतकऱ्यांच्या हिताचीच; उधळपट्टीचे आरोप निराधार- कृषी विभागाचे स्पष्टीकरण

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतून राबविण्यात येत असलेल्या सौर विद्युत कुंपण योजनेबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांतील आरोप वस्तुस्थितीला धरून नसून दिशाभूल करणारे आहेत.ही...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!