Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजपोटगांव येथे निवासी श्रमसंस्कार विशेष शिबिराचे यशस्वी समारोप-देसाईगंज औद्योगीक प्रशीक्षण संस्थेचा पुढाकार

पोटगांव येथे निवासी श्रमसंस्कार विशेष शिबिराचे यशस्वी समारोप-देसाईगंज औद्योगीक प्रशीक्षण संस्थेचा पुढाकार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

पोटगांव (देसाईगंज) :- औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज तर्फे राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत पोटंगाव येथे निवासी श्रमसंस्कार विशेष शिबिराचा व एन.एस.एस.तर्फे ध्वजारोहण विजय दडमल सरपंच यांच्या  हस्ते करण्यात आले. दिनांक ३/३/२०२४ ते ९/३/२०२४ पर्यंत सदर शिबीर आयोजित करण्यात आले होते.सदर शिबिर दरम्यान पोटगाव येथील संपूर्ण गावातील परीसर स्वच्छता,जिल्हा परिषद शाळा व गावातील नागरिकांच्या घरील किरकोळ इलेक्ट्रिकलचे कामे,प्लंबिंगचे कामे व वेल्डिंगची कामे करण्यात आली.तसेच ग्रामपंचायत व शाळेतील झाडांना रंगरंगोटी करण्यात आली,गावातील मंदिर,विहार, पुतळे व व परिसर स्वच्छ करण्यात करून सायबर क्राईम,पोक्सो कायदा,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, गावकऱ्यांच्या मनोरंजनासाठी कार्यक्रमादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले.नेहरू युवा केंद्रातर्फे व मुक्ती पथ सर्च चातगाव युवकांना सोशल मीडिया व मोबाईलचा अतिवापर याची चित्रफित व मार्गदर्शन करण्यात आले.भारुड कलाकार चेतन ठाकरे यांनी मनोरंजनात्मक प्रबोधन केले.सदर शिबिरा दरम्यान आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी भेट दिली.विजय दडमल सरपंच, उपसरपंच पंकज वंजारी,संजय गाडेकर पोलीस निरीक्षक एस.आर.पी.एफ.कॅम्प विसोरा यांनी स्वयंसेवकांना आय.टी.आय,आई वडील,देशाचे नाव लौकिक करण्याचे अमूल्य मार्गदर्शन केले.नरेंद्र गजपुरे ग्रा.प.सदस्य,सौ.दिपमाला राऊत ग्रा.प.सदस्य व अन्य प्रतिष्ठित महिला दौरे पोलीस उपनिरीक्षक,इंगोले पोलीस कॉन्स्टेबल,बी.टी.दोनाडकर पोलिस पाटील, प्रभारी मुख्याध्यापीका सौ.जी.व्ही.मस्के प्रामुख्याने उपस्थितीत होते.

सुरेश एस.चौधरी प्राचार्य तथा कार्यक्रमाध्यक्ष व रविकांत गोतमारे गटनिदेशक यांच्या मार्गदर्शनात सदर शिबीर आयोजीत करण्यात आले.सदर समारोपाचे प्रास्ताविक सी.एम.गरमळे रा.से.यो.मुख्य समन्वयक यांनी केले.प्रफुल मेश्राम वळु माता संगोपन केंद्र वडसा व मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणय राऊत रा.से.यो.चे प्रशिक्षणार्थी प्रतिनिधी यांनी आणि आभार प्रदर्शन व्ही.वाय.नागमोती रा.से.यो.सहसमन्वयक यांनी केले.  सदर कार्यक्रमासाठी श्रीमती एम.एस.जाधव गटनिदेशिका,आदर्श भोले,चंदू समर्थ.समर्थ, के.एस.उमक,आर.बी.भोयर,कु.मेघा चौदंते,कुमारी क्षमा बोंद्रे,एस.ए.पिलारे, एच.एस.मरसकोले ,शिबिरातील सर्व स्वयंसेवक ग्रामपंचायत पोटगांव येथील सर्व माननीय सदस्य व कर्मचारी,जिल्हा परिषद शाळेतील व शाळा समितीमधील कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले व गावकऱ्यांनी सदर शिबिराचा उत्स्फूर्तपणे लाभ घेतला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!