उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
गडचिरोली :- हल्ली लग्न सराई तसेच वाढदिवस असो वा कुठलेही कार्यक्रम असोत; गाव खेड्यात तसेच शहरी भागात मोठ्या प्रमाणावर डीजेच्या कर्कश आवाजात तरुणाई सोबतच महिला मंडळी, पुरुष मंडळी तसेच लहान चेंडक्या बरोबरच अनेकजण डीजेच्या तालावर थिरकण्याचा प्रमाण दिवसेंदिवस वाढलेला दिसून येतो.अशातच कित्तेकजण पोलीस प्रशासनाची रीतसर परवानगी न घेताच डीजेचा कर्कश आवाज करून कित्तेकजण नागरिकांच्या जीवावर जणूकाही उठले की काय? अशी हल्ली प्रचिती निर्माण झाली असल्याने पोलीस प्रशासन अशांवर कारवाई करणार तरी कधी?असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
डीजेच्या कर्कश आवाजावर तरुणाई तसेच इतर डोलारा जरी करीत असले तरी अनेकांना त्याचा त्रास सहन करावा; लागत आहे.मोठ्या आवाजामुळे अनेकजण वयोवृद्ध तसेच लहान मुले मुली मृत्युमुखी पडलेले दिसून येत आहेत.अशातच स्वतःच्या स्वार्थापोटी कुणाचाही विचार न करता; नुसता देखावा करून अनेकजण नागरिकांच्या जीवावर उठले असल्याने यांचे डीजे बंद करून; यावर त्वरित आळा घालण्यात यावा; अशी मागणी जोर धरू लागली आहे.

