Wednesday, September 2, 2026
Homeदेसाईगंजरेणुकाबाई उके विद्यालय शिवराजपूर येथे सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभ…..

रेणुकाबाई उके विद्यालय शिवराजपूर येथे सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभ…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- तालुक्याच्या शिवराजपूर येथील रेणुकाबाई उके विद्यालयाचे मुख्याध्यापक ओ.एन लेनगुरे हे नुकतेच नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम रेणुका चॅरिटेबल ट्रस्ट कुरुडचे क्षितिज भाऊ उके यांच्या अध्क्षतेखाली रेणुकाबाई उके विद्यालयात पार पडला.

मुख्याध्यापक ओ.एन लेनगुरे यांनी विद्यालयात असतांना कितीतरी वर्षे  सेवा केली.शाळेतून अनेक विद्यार्थी घडविले,शिस्तप्रिय,मनमिळावू स्वभाव तसेच विद्यार्थ्यांप्रती असलेली कळकळ त्यांनी जोपासून नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झालेत; असे सत्कार समारंभ प्रसंगी रेणुका चॅरिटेबल ट्रस्ट कुरुडचे क्षितिज भाऊ उके यांनी म्हटले आहे.सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सचिवराऊत,सहसचिव लांडगे, सत्कारमूर्ती सेवानिवृत्त मुख्याध्यापक लेनगुरे,विजय सुखदेवे सेवानिवृत्त मुख्या.,कु वासनिक मॅडम प्रभारी मुख्या.,लाडे मुख्या. कमलेश उके विद्यालय सावंगी,रंगारी,शेंडे, व दोनाडकर आदी उपस्थित होते.सेवानिवृत्त मुखयाध्यापक लेनगुरे यांच्या जीवनकार्याचा आढावा घेवून शुभेच्छा देण्यात आल्या व क्षितिज भाऊ उके तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन लेनगुरे यांचा सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जवंजार तर आभार वाईकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी सुखदेवे,धुरके मॅडम,नूतन मेश्राम मॅडम,प्रमोद राऊत, उमाजी कुथे तसेच श्यामराव शेंडे यांनी सहकार्य केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!