Sunday, August 23, 2026
Homeनागपूरनागपुरात मद्य प्रेमींनी दहा महिन्यांत तब्बल ५४४ कोटींची ढोसली दारू-दुःखाच्या क्षणी पिनाऱ्यांची...

नागपुरात मद्य प्रेमींनी दहा महिन्यांत तब्बल ५४४ कोटींची ढोसली दारू-दुःखाच्या क्षणी पिनाऱ्यांची संख्या अधिक 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

नागपूर :- सध्याच्या घडीला दारू पिणाऱ्यांचा कल मोठ्या प्राणावर वाढला आहे.लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत दारूच्या आहारी घेल्याचे सगळीकडेच दिसून येत आहे.आनंद असो की दुःख असो सर्वच काळात नागरिकांना दारू ढोसल्याशिवय होत नाही. महागाई असो की बेरोजगारी दारू विक्रीवर कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही.असाच प्रकार हल्ली नागपुरात दिसून येतोय.दारूवर नागपुरात केवळ दहा महिन्यांत मद्य प्रेमींनी तब्बल ५४४ कोटी रुपयांची दारू ढोसली आहे.

विदेशी मद्याच्या तुलनेत देशी दारूची विक्री अधिक आहे.यावरून स्पष्ट होते की मध्यम आणि निम्न मध्यम वर्गीय लोक दारूच्या आहारी गेले आहेत.उत्पादन शुल्क विभागाच्या आकड्यानुसार मद्यविक्री झपाट्याने वाढत आहे.गतवर्षी २०२१-२२ मध्ये एप्रिल-डिसेंबर दरम्यान ३२३ कोटींवर मद्यविक्री झाली होती.२०२२-२३ मध्ये यात वाढ होत 544 कोटींपेक्षा अधिकची विक्री झाली. केवळ 10 महिन्यात लोकांनी मद्यावर 220 कोटी रुपये अधिक खर्च केले आहे. झालेली वाढ आश्चर्यजनक आहे.

दुःखाच्या क्षणी दारू पिणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.लाखो लोक दुःख विसरण्यासाठी दारू पितात तर पार्टी आणि लग्न समारंभामध्ये जश्न करण्यासाठी ‘चेस’ केले जाते.या दोन्ही स्थितीचा मद्य व्यावसायिकांना लाभ होतो.

ब्रॅण्डेडची मागणी वाढली

पूर्वी शहरात विस्की,रम,वोडका आदी सामान्य ब्रॅण्डची विक्री होत होती.परंतु आता महागड्या ब्रॅण्डची मागणी वाढत आहे.एक बाटली (७५० एमएल) खरेदी करण्यासाठी लोक आता ५,०००-१०,००० रुपये खर्च करायला मागे-पुढे पाहात नाही. त्यांना स्कॉच हवे असते.आता दारूच्या दुकानांमध्ये स्कॉचकरिता स्वतंत्र गॅलरी तयार केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे दोन मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाची संततधार सुरू आहे.पावसामुळे काही ठिकाणची नाले पाण्याने भरभरून वाहू लागले आहेत. अश्यातच काही नाल्यांवरील पुल ठेंगणे...

शेतावर गेला ‘तो’ घरी परतलाच नाही; आज सापडला मृतदेह.. – कोंढाळा येथील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-शेतावर धानपिकाला खत मारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा दुसऱ्या दिवशी चक्क मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना ही देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा...

देसाईगंज ठाणेदारांची सट्टा-पट्टी व्यवसायावर धाड; ११ जण गजाआड.. – दुचाकी वाहनांसह साहित्य नेले उचलून..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरातील मुख्य बाजारपेठेसह तालुक्यातील विविध गावात सट्टा-पट्टी व्यवसायाला मोठे उधाण आल्याची बाब उघडकीस येताच नव्याने रुजु झालेले देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!