उद्रेक न्युज वृत्त
संपादक/मुनिश्वर बोरकर
गडचिरोली :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रमुख अजित पवार हे युवा संसद वेध भविष्याचा विचार मंथन शिबिर कार्यक्रमाला दि. ४ मार्च २०२४ ला दुपारी १२ वाजता सुमानंद सभागृह आरमोरी रोड गडचिरोली येथे होवू घातलेल्या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत. आगामी लोकसभा-विधानसभेची पूर्वतयारी करण्यासाठी व चिमुर-गडचिरोली लोकसभेची महायुतीतील उमेदवारी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना देता येईल काय? याची चाचपणी होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार सोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे , अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावराव बाबा आत्राम, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे युवा नेते पार्थ पवार,राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण,कार्याध्यक्ष निखिल ठाकरे आदि उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर,माजी जि.प.अध्यक्षा भाग्यश्री आत्राम,माजी बांधकाम सभापती नाना नाकाडे,सरचिटणीस ऋसिकांत पापडकर,युनुस शेख आदींची उपस्थिती लाभणार आहे.तरी हजारोच्या संख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे गडचिरोली युवा अध्यक्ष लिलाधर भरडकर यांनी केले आहे.

