संपादक/मुनिश्वर बोरकर
गडचिरोली :- दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत चारचाकी वाहन तसेच दुचाकी वाहनांचा वापर करून अवैध दारू तस्करी करीत असल्याचे दिसून येत आहे.अशातच आता अवैध दारू तस्करी करणाऱ्यांनी नामी शक्कल लढवित तेलंगणा राज्यातून वैनगंगा नदिपात्रातून चक्क बैलबंडीने दारू तस्करी करीत असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे तेलंगणा राज्यातून बैलबंडीने दारू तस्करी करणाऱ्या तिन बैलबंडी सहीत चौघांना रंगेहात पकडले.स्थानिक गुन्हे शाखेने सीरोंचा तालुक्यातील टेकडा (ताला) वैनगंगा नदिपात्रातून बामणी मार्ग दारू तस्करी करीत असलेले संदिप दुर्गम, व्यकंटी कोटम,बापू दुर्गम व श्रीनिवास दुर्गम राहणार सर्व टेकडा (ताला) या चार व्यक्तींना बैलबंडी सहीत पकडले.यात बिअर व व्हिस्की च्या ५० बॅक्स होत्या. त्याची अंदाजे किंमत २ लाख ५२ हजार रुपये एवढी आहे.बामणी पोलिसांनी त्या चौघांनाही पकडून जेरबंद केले.सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक निलोप्पल,अप्पर पोलिस अधिक्षक कुमार चिंता , अप्पर पोलिस अधिक्षक एम. रमेश, पोलिस निरिक्षक उल्हास भुसारी यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली.तेलंगणा सिमेतून सिरोंचा नदि पुलावरून व नदिपात्रातून अवैध दारूची तस्करी नेहमीच होत असल्याने यावर कुठेतरी आळा घातला जावा; अशी मागणी जोर धरू लागली आहे.

