Sunday, April 19, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त१७ हजार पोलिसांची भरती प्रक्रिया राज्यात राबविण्यात येणार-राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री...

१७ हजार पोलिसांची भरती प्रक्रिया राज्यात राबविण्यात येणार-राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात महाराष्ट्र राज्यात पोलिसांची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत.अशातच कायदा व सुव्यवस्था राखताना पोलिस दलाला मोठ्या तणावाला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे राज्यात १७ हजार पोलिसांची पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे; अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज दि.२७ फेब्रुवारी रोजी दिली.राज्याचा वर्ष २०२४-२५ चा अंतरिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री पवार यांनी आज विधान सभेत सादर केला.यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज मंगळवारी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा २०२४-२५ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला.राज्यातील पर्यटक आणि भाविकांना किफायतशीर दरामध्ये उत्तम सुरक्षित सुविधा पुरवण्यासाठी श्रीनगर,जम्मू काश्मीर आणि श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना दिली.

राज्यात नवीन सुक्ष्म व लघू उद्योग धोरण लागू केले जाणार आहे.दाओसमधील करारानुसार ३ लाख रुपयांची गुंतवणूक झाली असून २ लाख रोजगार निर्मिती होणार आहे.पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातल्या मौजे वडज इथे शिवसंग्रहालय उभारण्यात येणार आहे.यात वस्तुसंग्रहालय, शिवकालीन गाव,किल्ल्यांच्या प्रतिकृतींचा समावेश असेल,असे त्यांनी सांगितले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!