Thursday, July 16, 2026
Homeदेसाईगंजमुख्य रस्त्यावर भले मोठे अवैध रेतीचे ढिगारे; तरीही देसाईगंज महसूल विभागाचे नगारे….-रेती...

मुख्य रस्त्यावर भले मोठे अवैध रेतीचे ढिगारे; तरीही देसाईगंज महसूल विभागाचे नगारे….-रेती पकडण्याचा केलाय दावा; मात्र मुख्य रस्त्यावर अवैध पडलेल्या रेतीचा हेवा…!-कोंढाळा गावातील प्रकार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

देसाईगंज (गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा गावात सध्याच्या घडीला एक अनोखा प्रकार हल्ली निदर्शनास येऊ लागला असल्याने याचे नवल वाटत आहे.काही दिवसांपूर्वी एका अवैध उत्खनन करणाऱ्या रेती चोरट्याची २६ ब्रास रेती देसाईगंज महसूल विभागाच्या अधिकारी तसेच कर्मचारी वर्गांनी जप्त करून जणूकाही थोर महात्मे होऊन गेलेत चरित्र त्यांचे पहा जरा….! आपणही त्यांच्या समान व्हावे; हाच सापडे बोध खरा..! असे चित्र काही काळासाठी निर्माण झाले असल्याची अनेकांना प्रचिती दिसून आली आहे.अशातच कित्तेक जणांना याची कल्पना वा माहिती तसेच गावात चर्चा झाली नसल्याने अनेकजण नगारे वाजवू लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

महत्वाचे म्हणजे, ‘भला मोठा रेतीचा साठा अन् रेती तस्कराचा घाटा’असे देसाईगंज महसूल विभागाच्या अवैध रेतीच्या २६ ब्रास पकडलेल्या कारवाई नुसार दिसून येत आहे.मात्र सध्याच्या घडीला गावातील मुख्य रस्त्यावरील खोदकामातील मुरूम एका खाजगी कामावर अवैधरीत्या टाकून तसेच कितीतरी अवैध रेतीचे ढिगारे गावातील मुख्य रस्त्यावर दिसून येत असूनही न दिसण्या सारखे करणे म्हणजे ‘दया कूछ तो गडबड है’ अशी शंका-कुशंका अनेकांच्या मनात घर करून सोडत आहे.अशातच कारवाई करण्यासाठी पुढे धाजवणारे झोपा काढून राहिले की काय? असा अनेकांकडून प्रश्न उपस्थित केला जातो आहे.सध्याच्या घडीला रेती घाटांचे लिलाव झालेले नाही.अशातच अवैध रेतीचे ढिगारे गावातील गल्ली बोळात दिसून येत आहेत.तसेच अवैध चोरट्या रेतीचा बांधकामामध्ये वापर करून कमी दरात रेती खरेदी करणे व जास्तीचे बिल(देयक) जोडून रक्कम खिशात घालण्याचा हल्ली ट्रेण्ड वाढलेला दिसून येत आहे.यावर कुठेतरी आळा घातला जावा; तसेच तालुक्यातील अवैध रेतीच्या ढीगाऱ्यांचा पंचनामा करून अवैध रेती जप्त करण्यात यावी; अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दहावीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; दोन आरोपी फरार..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.दोन नराधमांनी इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीच्या असह्यतेचा गैरफायदा घेत पैश्याचे आमिष दाखवून वारंवार...

गुरुजींची डोकेदुखी वाढली; विविध जबाबदारीचे ओझे लादून गुणवत्तेची अपेक्षा.. -पाणी डोक्याच्यावर गेल्यास काय खाक गुणवत्ता वाढणार?

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली शिक्षकांची अवस्था "ना घर के ना घाट के" अश्या प्रकारची झाली आहे.एक काळ होता जेव्हा शिक्षकाच्या हातात खड्डू आणि पुस्तक...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय मुंबई येथे मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र...

अखेर प्रतीक्षा संपली; लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपली असून मागील महिन्याच्या दीड हजाराची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.जून महिना संपून जुलै...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!