Thursday, April 30, 2026
Homeगडचिरोलीओबीसी बांधवांना मिळणार हक्काचे घरकुल -ओबीसींकरिता राज्यात प्रथमच घरकूल योजनेला झाला प्रारंभ 

ओबीसी बांधवांना मिळणार हक्काचे घरकुल -ओबीसींकरिता राज्यात प्रथमच घरकूल योजनेला झाला प्रारंभ 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- अनुसूचित जाती,अनुसूचित जमातीप्रमाणेच आता विशेष मागास प्रवर्ग (ओबीसी) लाभार्थ्यांना मोदी ग्रामीण आवास योजना सुरू करण्यात आली आहे.या योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला २०२३-२४ वर्षाकरिता ६ हजार ५४८ घरकुलाचे उद्दिष्ट दिले गेले आहे.यात ओबीसी प्रवर्गातील ६ हजार १३५ तर एसबीसी प्रवर्गाकरिता ४१३ घरकूल मंजूर करण्यात आले आहे. ओबीसींकरिता राज्यात प्रथमच घरकूल योजनेला प्रारंभ झाला असून लाभार्थी सद्यस्थितीत या योजनेच्या लाभासाठी कागदपत्रे गोळा करताना निदर्शनास येत आहेत.केंद्र व राज्य शासनाद्वारे घरकूल योजना  राबविण्यात येत आहे.मात्र यात ओबीसी प्रवर्गाचा समावेश नव्हता.परिणामी ओबीसी लाभार्थी केवळ प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज सादर करीत होते.या योजनेअंतर्गत प्रथम एसटी, एससी लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जात असल्याने ओबीसी लाभार्थ्यांना घरकुलापासून वंचित राहावे लागत होते.ही बाब लक्षात घेत केंद्र व राज्य शासनाने मोदी ग्रामीण आवास योजना लागू करेली आहे.या योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात ६ हजार ५४८ घरकुलाचा लाभ ओबीसींना देण्यात येणार आहे.

यामध्ये गडचिरोली तालुक्यात १ हजार ३७ घरकुल, आरमोरी ५९९, अहेरी ४८६, भामरागड १६, चामोर्शी १ हजार ९०१, धानोरा २४२, देसाईगंज ९६१, एटापल्ली ८६, कोरची ६६, कुरखेडा ५५५, मुलचेरा ६० तर सिरोंचा तालुक्यात ५३१ घरे मंजूर करण्यात आली आहेत.या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून जातीचे प्रमाणपत्र,उत्पन्नाचा दाखला, नमुना ८, घरटॅक्स आदी कागदपत्रांची अट घातली गेली आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी संबंधित नगरपंचायत,नगर परिषद तथा तहसिल कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!