Saturday, September 26, 2026
Homeगोंदियामला आत्ताच दारू दे…! अन्यथा तुला झोडपतो असे म्हणत मारले गालावर…-तळीरामावर पोलिसांत...

मला आत्ताच दारू दे…! अन्यथा तुला झोडपतो असे म्हणत मारले गालावर…-तळीरामावर पोलिसांत गुन्हा दाखल 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :- मला आत्ताच दारू दे, अन्यथा तुला झोडपतो,असे म्हणत गालावर मारले.ही घटना तालुक्यातील डांगोर्ली येथे सहा दिवसांपूर्वी रात्री 8 वाजता घडली.तक्रारीवरून आरोपी मदन रंगलाल पाचे (वय ४०) याच्याविरोधात रावणवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.तालुक्यातील डांगोर्ली येथील गजानन अनंतराम मेश्राम (वय ४१) हे मंगळवारी रात्री ८ वाजता आपल्या घरी पत्नी, मुलाबाळांसह जेवण करीत होते.या दरम्यान गावातील आरोपी मदन रंगलाल पाचे तिथे आला व दारूची मागणी केली. यावर गजानन मेश्रामने माझ्याकडे दारू नाही,असे म्हटले.यावरून आरोपी मदनने गजानन मेश्राम यांच्या घरातील साहित्य फेकून आरडाओरड केली.दारू देत नसल्याच्या कारणावरून गजानन मेश्रामच्या गालावर मारले.तसेच शिवीगाळ करीत तुम्हाला ठार मारतो, अशी धमकी दिली.याप्रकरणी गजानन मेश्राम यांनी आरोपी मदन पाचे विरोधात रावणवाडी पोलिसांत तक्रार दाखल केली.त्यावरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस हवालदार बघेले करीत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-‘दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.आम्ही शेतकऱी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे...

पोलीस दलात खळबळ; बेपत्ता पोलीस कर्मचाऱ्याचा सापडला मृतदेह..!

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलीस दलात खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार २६ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. तब्बल तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या...

बस आणि कारची समोरासमोर धडक; बीसीएन न्यूजचे संपादक गंभीर जखमी.. -नागपूरला हलवले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.झालेल्या अपघातात कारमधील बीसीएन न्यूजचे संपादक...

राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर.. -पहा संपूर्ण तालुक्यांची यादी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-यंदाच्या एलनिनोच्या प्रभावामुळे राज्याच्या विविध भागात दुष्काळी परिस्थिती उद्भवलेली आहे. राज्यातील विविध तालुक्यांमध्ये जून ते आजपर्यंतच्या कालावधीतील पर्जन्याची तूट व अन्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!