Thursday, October 15, 2026
Homeनागपूरअखेर काँग्रेस नेते व माजी मंत्री सुनील केदार यांना उच्च न्यायालयाने दिला...

अखेर काँग्रेस नेते व माजी मंत्री सुनील केदार यांना उच्च न्यायालयाने दिला जामीन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- काँग्रेस नेते व माजी मंत्री सुनील केदार यांना उच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर आज १० जानेवारी दुपारी त्यांची मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली.यावेळी त्यांचे केदार समर्थकांनी जल्लोषात स्वागत केले.यावेळी केदार यांनी समर्थकांना विजयाचे चिन्ह दाखवत अभिवादन स्वीकारले.आज दुपारी केदार यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.त्यामुळे बराच वेळ मध्यवर्ती कारागृहापासून सीताबर्डी परिसरात वाहतूक खोळंबली होती.जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १५३ कोटींच्या रोखे घोटाळ्यात ५ वर्षे शिक्षा सुनावल्यानंतर काल,मंगळवारी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केदार यांना जामीन मंजूर केला आहे.एक लाखाच्या जातमुचलक्यावर नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती उर्मिला जोशी यांच्या एकल खंडपीठाने निर्णय दिला. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी मृद व जलसंधारण विभाग सज्ज.. – “पाणी अडवा,पाणी जिरवा”चे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-'एल निनो'च्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता गृहीत धरून गडचिरोली जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी मृद व जलसंधारण...

दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा; दिवाळीपूर्वी मिळणार पाच हजार रूपयांची मदत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्र राज्य सरकारने दुष्काळग्रस्त यादीत ४० नवीन तालुक्यांचा समावेश केल्यामुळे ३५८ पैकी एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.अश्यातच खरीप...

आता राज्यातील ३०५ तालुके अंतिमतः दुष्काळी तालुके म्हणून घोषित.. – आणखी ४० तालुक्यांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील खरीप हंगामातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.यापूर्वी ट्रिगर-१(प्रथम कळ)अंतर्गत २६५ तालुके दुष्काळी तालुके म्हणून...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी सण-उत्सव,नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तसेच संभाव्य आंदोलने व सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!