Sunday, October 25, 2026
Homeकोंढाळारेती तस्कराची मुजोरी..साहेब तुम्ही खरोखरच गुन्हा दाखल करणार काय?…गावात पकडलेला ट्रॅक्टर नेला...

रेती तस्कराची मुजोरी..साहेब तुम्ही खरोखरच गुन्हा दाखल करणार काय?…गावात पकडलेला ट्रॅक्टर नेला पळवून; कोंढाळा गावातील प्रकार.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

कोंढाळा(देसाईगंज) :- तालुक्याच्या कोंढाळा गावामध्ये अजब-गजब प्रकार काल, दिनांक- ३० डिसेंबर रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आला असल्याने आश्चर्य व्यतिरिक्त नवलच वाटू लागले आहे.गावातील उपस्थित नागरिक तसेच प्रशासकीय अधिकाऱ्याच्या हातावर तुरी देऊन रेती भरलेला ट्रॅक्टर पळवून नेणे किती शरमेची व लाजिरवाणी बाब आहे.यावरून असे लक्षात येते की,चोरी तर चोरी वर शिनाजोरी..! असे दिसून येत असल्याने अशांवर आवर घालणार कोण? असा सवाल सगळ्यांकडून उपस्थित केला जातो आहे.

गडचिरोली जिल्ह्यात तसेच तालुक्यात काही ठिकाण सोडले तर ‘रेती घाट व पळणारी वाट’ शोधली जात आहे.त्यामुळे अवैध रेती चोरीचे प्रकरण दिवसेंदिवस वाढलेले दिसून येत आहेत.अशातच देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा गावात काही मुजोर रेती तस्कर कुणालाही न जुमानता आपलाच बोलबाला करून ‘मी बडा मी बडा’ असे स्वतःला समजून प्रशासनाची थट्टा करतांना दिसून येत आहेत.देसाईगंज महसूल विभागाने तालुक्यातील अवैधरित्या रेती तस्कर वा इतर गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करूनही कारवाईला न जुमानता मुजोरी सुरू असून काही गावातील तलाठी वा इतर कर्मचारी वर्गांना धमकवणीवजा बोलणी करून दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

काही विभागातील कर्मचारी वर्ग व झोलाछाप कार्यकर्ते रेती तस्करांसोबत हात मिळवणी करून पैसे उगारण्याचे काम करीत असल्याचीही खमंग चर्चा सर्वत्र सुरू आहे.रेती तस्कर मुजोरी करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे वरच्या स्तरापासून तर खालच्या स्तरापर्यंत कुठेतरी पाणी मुरल्या जात असावे?असा अंदाज व्यक्त केला जात आहे.अवैधरित्या रेतीचे ट्रॅक्टर वा इतर साधने सापडूनही मुजोरी केली जात असेल तर याला काय म्हणावे? त्याचप्रमाणे कुठलेही साधन सोडण्यात येऊ नये; याकरिता कठोरात-कठोर शिक्षा तसेच कारवाई होणे आवश्यक आहे; अन्यथा तुम्ही कितीही कारवाई करा; आम्ही झांगडगुत्ता करणारच..! असे झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे गावचे सामाजिक कार्यकर्ते लीलाधरभाऊ गुरूनुले यांनी म्हटले आहे.

देसाईगंज महसूल विभाग, मंडळ अधिकारी,ठाकरे 👇

आम्ही कारवाई करतो; मात्र गावातील नागरिक सहकार्य करीत नाही.रेती भरलेला ट्रॅक्टर पकडलेला होता; त्यानंतरही ट्रॅक्टर पळवून नेणे म्हणजे महसूल प्रशासनाची थट्टा केली असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे.त्यानुसार शनिवार तसेच रविवार असल्याने सोमवरला सदर इसमावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.तसेच सदर इसम गावातील असल्याने बचाव कार्य सुरू असल्याचे दिसून आले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीची मालिका सुरू; किंमती कमी होण्याचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त :-सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.आज,शनिवार २४ ऑक्टोंबर रोजी इंडीयन बुलियन मार्केटनुसार, देशभरात १० ग्रॅम...

एटापल्लीतील ३० गावांत जलसुरक्षा व शाश्वत उपजीविकेसाठी कार्यक्रम; ९६० कोटी लिटर अतिरिक्त जलक्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील ३० आदिवासी गावांमध्ये जलसुरक्षा बळकट करणे,शेतीची उत्पादकता वाढविणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी...

नागपूर विभाग पदवीधर निवडणूक; गडचिरोली जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सर्वाधिक.. -विभागाची सरासरी ६४.७६ टक्के..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत प्राप्त अहवालानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण...

रस्त्याच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; काम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी परिसरातील खांदला–चिरेपल्ली आणि चिरेपल्ली–आलापल्ली या एकूण २२ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!