उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५५ व्या पुण्यतिथी सोहळ्याचा श्री गुरुदेव सेवा मंडळ हनुमान वार्ड यांच्या वतीने तीन दिवशीय विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मंदिरात दीप प्रज्वलित करून कीर्तन,पालखी,राष्ट्रसंतांचे भजन व गुरुदेवाच्या जयघोषाने अवघी देसाईगंज नगरी दुमदुमून गेली.
देसाईगंज येथील राष्ट्रसंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमितील गुरुदेव प्रार्थना मंदिरात दीप प्रज्वल करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व इंजिनियर ग्रामगिता आधारित कीर्तनकार भाऊसाहेब थुटे यांच्या सप्तखंजेरी वादक यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला.त्यानंतर राष्ट्रसंतांची पालखी भजनासह निघून संपूर्ण शहरातून श्रीगुरुदेवाच्या भजन व जयघोष करीत त्याच दीवशी सायंकाळच्या सुमारास मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.त्यांनतर नाना महाराज परसवाडा यांच्या प्रार्थनेचे महत्व,ध्यान व ग्रामगितले विचारातील आचरण यावर व्याख्यान करण्यात आले.व शेवटी भाविक गुरुदेव भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.तीन दिवशीय कार्यक्रमास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे,माजी नगराध्यक्षा शालू दंडवते,माजी नगराध्यक्ष जेसामल मोटवाणी,ॲड. प्रकाश भैय्या,प्रा.काशिनाथ मातेरे,रामकृष्ण सहारे,विकास प्रधान,अशोक राऊत,विनोद फुलबांधे, विष्णू नागमोती,मारोती नागमोती,पुरुषोत्तम भागडकर,प्रशांत पिंजरकर,पांडुरंग बुराडे,सदाशिव कराणकर,प्रियंका भागडकर ,लता सहारे,मोहन सहारे ,बोडाले पेटीमास्तर,सुरेश नरहरशेट्टीवार व मोठया संख्येने गुरुदेव भक्त उपस्थित होते.

