उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यातील शेतकरी,महिला,युवक यांच्या समस्या, वाढती महागाई,बेरोजगारी अश्या विविध समस्याना घेऊन उद्या दिनांक- ११ डिसेंबर रोजी,नागपूर विधानभवनावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार असल्याने त्या संदर्भात गडचिरोली आदिवासी काँग्रेसचे जिलाध्यक्ष छगन शेडमाके यांच्या मार्गदर्शनाखाली देसाईगंज येथे तालुकास्तरीय नियोजन बैठक ९ डिसेंबरला पार पडली.

सदर झालेल्या बैठकीत ११ डिसेंबर रोजी, नागपूर विधानभवनावर होणाऱ्या हल्लाबोल मोर्च्यात देसाईगंज तालुक्यातील हजारोच्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते,महिला,युवक आणि शेतकरी यांनी सहभागी होण्याचे आवाहन देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटी तर्फे करण्यात आले आहे.
सदर बैठकीला आदिवासी काँग्रेसचे जिलाध्यक्ष छगन शेडमाके,तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र गजपुरे,तालुका काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष नितीन राऊत,युवक काँग्रेस जिल्हा प्रवक्ते पंकज चहांदे,ओबीसी तालुकाध्यक्ष कैलाश वानखेडे, सेवादल तालुकाध्यक्ष दुषान्त वाडगुरे, शहराध्यक्ष भिमराव नगराळे,युवा नेते पिंकू बावणे,सागर बनसोड, सेवादल सोशल मीडिया अध्यक्ष मोहित अत्रे,भुमेश्र्वर सिंगाडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते बैठकीला उपस्थीत होते.

