Sunday, April 19, 2026
Homeचंद्रपूरस्कूल बस चालकास जंगलात लाकूड गोळा करणे भोवले…-वाघाने केले ठार…

स्कूल बस चालकास जंगलात लाकूड गोळा करणे भोवले…-वाघाने केले ठार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर :- शहराजवळील जुनोना जंगलात लाकूड गोळा करण्यासाठी गेलेल्या स्कूल बस चालकावर वाघाने हल्ला केला.यात बस चालकाचा मृत्यू झाला. सदरची घटना काल सोमवारी २१ नोव्हेंबरला सकाळी घडली.मनोहर वाणी वय ५२ वर्षे असे मृताचे नाव आहे.मनोहर हा शहरातील दादावाडी विद्यानिकेतन हायस्कूलमध्ये स्कूल बसचालक म्हणून कार्यरत आहे. मनोहर हा बायपास जुनोना रोड येथील संत तुकाराम चौक,आंबेडकरनगर येथील रहिवासी आहे.वाघाच्या हल्ल्यातील हा या वर्षांतील २१ वा बळी आहे.

शहरातील दादावाडी येथील विद्यानिकेतन हायस्कूलमधील स्कूल बस चालक मनोहर वाणी हे सोमवारी सकाळी जुनोना जंगलात लाकडे गोळा करण्यासाठी गेले होते.दरम्यान,भक्ष्याच्या प्रतीक्षेत असलेल्या वाघाने मनोहरवर हल्ला केला.ज्यामध्ये मनोहरचा मृत्यू झाला.मनोहर गेल्या १५ वर्षांपासून बसचालक म्हणून काम करत होते.शनी मंदिर परिसरापासून सुमारे ३०० ते ४०० मीटर अंतरावर मनोहर यांचा मृतदेह आढळून आला.याबाबतची माहिती आपचे राजू कुडे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत वनविभागाला माहिती दिली.

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला.कुडे व परिसतील इतर नागरिकांनी मृताच्या कुटुंबीयांना २५ लाखांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली.चर्चेनंतर वनविभागाने तपास पूर्ण करून आर्थिक मदतीचे आश्वासन दिले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

पोलिसांच्या एका चुकीमुळे गडचिरोली हत्या प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस मिळाला जामीन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सात वर्षावरील गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत न्यायालयातील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावे लागते.त्यानुसार,न्यायालय...

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!