उद्रेक न्युज वृत्त :- कित्तेक शेतकरी बांधवांना शासनाच्या अनेक योजनांची माहिती नसते.त्यामुळे अनेक शेतकरी बांधव योजनांपासून तसेच मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहतात.अशातच अनेक शेतकरी बांधवांच्या अशिक्षितपणाचा फायदा अनेकजण घेतांना दिसून येतात.हल्ली दलाल म्हणून काम करणारे आपल्याच गण-गोतांच्या चुट्टी वरून हात फिरवून पैसे रेटण्याचे काम करीत असल्याचा प्रकार निदर्शनास येऊ लागला आहे.’आम्ही तुमचे संपूर्ण काम करून देतोय’ म्हणून एवढे पैसे लागणार म्हननाऱ्यांची व चोरघोड्यांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढतच चालली आहे.मात्र अशा भूलथापांना व बाते बंबाळ करणाऱ्यांच्या आहारी कुणीही जाऊ नये; यासाठी आम्ही आपणांस सांगू इच्छितो की,कुणालाही चाराणे पैसे खर्च करण्याची वा देण्याची गरज नाही. केवळ आवश्यक असणाऱ्या कागद पत्रांसाठी खर्च येत असतो.आजच्या घडीला बरेच जण शेतकरी आहेत.शेतकरी बांधवांच्या भरवशावर संपूर्ण कुटुंब अवलंबून असतो.त्यामुळे वडील,मुलगा व कुटुंबातील इतरही सदस्य शेतकरी म्हणून गणले जातात.एखादेवेळी अपघातात शेतकऱ्याला कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास शेतकरी किंवा वारसदारांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ राबविण्यात येते.जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा; गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसीलदार,तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडे घटना घडल्यानंतर ३० दिवसांच्या आत परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा; अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या सर्व क्षेत्रीय अधिकारी-कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा.
सातबारा उतारा,मृत्यूचा दाखला,शेतकऱ्यांचे वारस म्हणून गाव कामगार तलाठ्याकडील गाव नमुना क्रमांक- ६ (क) नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद, वारसदाराचे ओळखपत्र आधार कार्ड, पॅनकार्ड,बँक पासबुक,निवडणूक ओळखपत्र,अपघातग्रस्ताचा वयाचा दाखला,प्रथम माहिती अहवाल(FIR), घटनास्थळ पंचनामा,अपघाताच्या स्वरूपानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत कागदपत्रे देणे आवश्यक आहे.
योजनेत अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख, अपघातामुळे दोन डोळे,दोन हात किंवा दोन पाय निकामी झाल्यास दोन लाख,अपघातामुळे एक डोळा आणि एक हात किया एक पाय निकामी झाल्यास दोन लाख,तसेच अपघाताने एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख आर्थिक सहाय्य देण्यात येते.योजनेत रस्ता अपघात,रेल्वे अपघात,पाण्यात बुडून मृत्यू,जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणांमुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात,वीज पडून मृत्यू,खून,उंचावरून पडून झालेला अपघात,सर्पदंश व विंचूदंश,नक्षलवादी यांच्याडून झालेल्या हत्या,जनावरांच्या हल्ल्यात-चावण्यामुळे जखमी,मृत्यू,बाळंतपणातील मृत्यू,दंगल आदी कोणताही अपघातांचा यात समावेश आहे.
योजनेत नैसर्गिक मृत्यू,विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न,आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करून घेणे,गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना व अमली पदार्थाच्या अंमलाखाली असताना झालेला अपघात,भ्रमिष्टपणा, मोटार शर्यतीतील अपघात यांचा समावेश नाही.

