उद्रेक न्युज वृत्त :- दिल्ली परिसरात भूकंपाचा जोरदार धक्का बसला असल्याची घटना उघडकीस आली आहे.मागील दोन आठवड्यापासून दिल्लीला तिसऱ्यांदा भूकंपाचा धक्का जाणवला आहे.भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की,लोक घाबरले आणि घराबाहेर पळाले.नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी नुसार भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये असून ५.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे.त्याचे धक्के दिल्ली परिसरालाही बसले.सध्यातरी या भूकंपामध्ये कोणतीही हानी झाल्याची माहिती नसल्याचे पुढारी वृत्ताने म्हटले आहे.
तज्ज्ञांच्या मते,भूकंपाचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे टेक्टोनिक प्लेट्सच्या स्थितीत बदल होणे. पृथ्वीवर १२ टेक्टोनिक प्लेट्स आहेत.या प्लेट्स एकमेकांवर आदळल्यावर बाहेर पडणाऱ्या ऊर्जेला भूकंप म्हणतात.या प्लेट्स अतिशय संथ गतीने फिरतात आणि दरवर्षी ४ ते ५ मिमीने त्यांच्या ठिकाणाहून सरकतात.अशा स्थितीत एक प्लेट दुसऱ्यापासून दूर जाते आणि दुसरी प्लेट दुसऱ्याच्या खाली सरकते.या प्रक्रियेदरम्यान,प्लेट्सच्या टक्करमुळे भूकंप होतो.

