Saturday, September 5, 2026
Homeगडचिरोलीछत्तीसगड व तेलंगणा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२३-औद्योगिक उपक्रम किंवा इतरआस्थापनातील व्यक्तींना मतदानाकरीता...

छत्तीसगड व तेलंगणा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२३-औद्योगिक उपक्रम किंवा इतरआस्थापनातील व्यक्तींना मतदानाकरीता सुट्टी जाहीर….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- महाराष्ट्र शासन अधिसूचना दिनांक- ३ नोव्हेंबर २०२३ अन्वये,छत्तीसगड राज्यातील जे मतदार महाराष्ट्र राज्यातील सीमा लगतच्या जिल्ह्यांमध्ये (गोंदिया व गडचिरोली) कार्यरत आहेत; तथापि,त्यांची नावे छत्तीसगड राज्यातील मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत;अशा मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा; यासाठी मंगळवार,दि.७ नोव्हेंबर २०२३ रोजी आणि शुक्रवार दि.१७ नोव्हेंबर २०२३ या मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

तसेच तेलंगणा राज्यातील जे मतदार महाराष्ट्र राज्यातील सीमा लगतच्या जिल्हांमध्ये गडचिरोली, चंद्रपुर,यवतमाळ व नांदेड मध्ये कार्यरत आहेत. तथापि,त्यांची नावे तेलंगणा राज्यातील मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत; अशा मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा; यासाठी गुरूवार दि. ३० नोव्हेंबर २०२३ या मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करीत आहे.ही सुटी केवळ मतदानाच्या दिवशी अनुज्ञेय राहील;असे अधिसुचनेव्दारे कळविण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी,गडचिरोली यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!