Thursday, October 15, 2026
Homeनागपूरअजब-गजब कारनामा… अन् ट्रायलच्या नावाखाली दुचाकी घेऊन झाला पसार…- बाईक विक्रीची ऑनलाईन जाहिरात...

अजब-गजब कारनामा… अन् ट्रायलच्या नावाखाली दुचाकी घेऊन झाला पसार…- बाईक विक्रीची ऑनलाईन जाहिरात टाकणे तरुणीस पडले महागात…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- एखादा इसम कधी कुणाची फसवणूक करणार हे सांगता येत नसल्याने नागरिकांनो सावधान..! असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.कारण मागील काही महिन्यांपूर्वी गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा गावातील दोन व्यक्तींना; बाहेरील अज्ञात इसम येऊन स्वस्तात डिझेल देणार म्हणून त्यांचीच दुचाकी व पैसा गोळा करून पोबारा केल्याची घटना घडली व त्या चोरट्याचा अजून पर्यंत थांगपत्ताच लागलेला नाही.अशातच महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरात अजब-गजब कारनामा घडल्याची घटना उघडकीस आली आहे.

नागपूरच्या एका तरुणीने महागडी दुचाकी विक्रीची ऑनलाइन जाहिरात OLX वर पोस्ट केली.जाहिरात पोस्ट केल्या नंतर एका अज्ञात तरुणाने सदरची गाडी पाहण्यासाठी तरुणीस आग्रह केला.त्यानुसार गाडी पाहण्यासाठी अज्ञात तरुणाने; तरुणीस नागपूरच्या केडीके कॉलेज रस्त्यावर बोलावले व दुचाकीची ट्रायल घेतो असे सांगितले.मात्र बराच वेळ होऊनही दुचाकीची ट्रायल घेणारा अज्ञात तरुण परतलाच नाही.त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे तरुणीस लक्षात आले.त्यानुसार फसवणूक आणि चोरीची तक्रार नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.सदर तरुणीचे नाव पारुल सोनी असे आहे.सध्या स्थितीत पारूलला महागडी गाडी विक्रीची जाहिरात OLX वर टाकणे महागात पडले आहे.ट्रायलच्या नावावर वाहन चोरीच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी अज्ञात तरुणावर गुन्हा दाखल करीत आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाचन संस्कृतीच्या चळवळीत महात्मा गांधी शाळेचा पुढाकार.. – आज ‘ग्रंथालय आपल्या दारी’ उपक्रमाचा दिमाखात शुभारंभ; वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करून ज्ञानसमृद्ध,वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली आणि स्पर्धा परीक्षांसाठी सज्ज अशी पिढी घडविण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक...

संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी मृद व जलसंधारण विभाग सज्ज.. – “पाणी अडवा,पाणी जिरवा”चे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-'एल निनो'च्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता गृहीत धरून गडचिरोली जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी मृद व जलसंधारण...

दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा; दिवाळीपूर्वी मिळणार पाच हजार रूपयांची मदत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्र राज्य सरकारने दुष्काळग्रस्त यादीत ४० नवीन तालुक्यांचा समावेश केल्यामुळे ३५८ पैकी एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.अश्यातच खरीप...

आता राज्यातील ३०५ तालुके अंतिमतः दुष्काळी तालुके म्हणून घोषित.. – आणखी ४० तालुक्यांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील खरीप हंगामातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.यापूर्वी ट्रिगर-१(प्रथम कळ)अंतर्गत २६५ तालुके दुष्काळी तालुके म्हणून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!