Monday, August 31, 2026
Homeगडचिरोलीगुलाबी थंडीला जिल्ह्यात झाली सुरुवात….

गुलाबी थंडीला जिल्ह्यात झाली सुरुवात….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- जिल्ह्यात गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे.तापमानात दिवसेंदिवस घसरण होत असल्याने मागील चार-पाच दिवसांपासून गारठा जाणवू लागला आहे.थंडीला सुरुवात झाल्यानंतर लगेच शहरात उबदार कपड्यांची दुकाने थाटली गेली.वाढत्या थंडीमुळे सर्दी,खोकला,डोकेदुखीसारख्या आजारांमध्ये वाढ होत आहेत.थंडीपासून बचावासाठी उबदार कपड्यांच्या खरेदीकडे जिल्हावासींचा कल वाढल्याने दुकानांमध्ये गर्दी दिसत आहे.दुपारी उन्हाची काहीशी तीव्रता जाणवत असली तरी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत थंडीचा गारवा जाणवतो.यंदा पाऊस अधिक झाल्याने थंडीत वाढ होण्याची शक्यता नागरिकांमधून वर्तवली जात आहे.परतीचा पाऊसही यंदा लांबला.त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपासून थंडीत वाढ झाली आहे.हिवाळ्यात त्वचा कोरडी होणे,ओठ फाटणे अशा त्वचाविकारांच्या रुग्णांचीही गर्दी दवाखान्यात दिसून येत आहे. अस्थमा,न्यूमोनिया व संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ झाली आहे.दोन वर्षांखालील बालकांना न्यूमोनियाचा त्रास होत आहे.या काळात आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.त्वचेची काळजी घेण्यासाठी गरम कपडे घालावेत व नागरिकांनी थंडी पासून बचाव करावे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!