उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
कोंढाळा(गडचिरोली):- छत्तीसगढ वरून १४ चाकी ट्रक सिमेंट भरून रात्रीच्या सुमारास चंद्रपूरला जाण्यासाठी निघाला होता.त्यानुसार ट्रकचे चालक-वाहक यांनी देसाईगंज-आरमोरी मार्गाची निवड केली. मात्र रात्रौच्या सुमारास मुख्य मार्गावरून ट्रक व इतर चारचाकी वाहने सुसाट वेगाने धावतांना दिसून येतात.अशातच वाहन चालकांना नवीन मार्गांची जाणिव नसल्याने अती उतावीळपणा अंगलट येत असतो.असाच प्रकार आज पहाटे उघडकीस आला आहे.

देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा गावापासून देसाईगंज-आरमोरी मार्गे दीड किलोमिटर अंतरावर असलेल्या लहरी कारखाणा नजिक; समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाला वाचविण्याच्या नादात सिमेंट भरलेला ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याची घटना आज दिनांक-२४ ऑक्टोंबर २०२३ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.छत्तीसगढ वरून १४ चाकी ट्रक क्रमांक- सीजी ०८ ए एच ५०७१ चंद्रपूरला जाण्यासाठी निघाला; मात्र कोंढाळा-लहरी कारखाणा नजिक अज्ञात वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात; सिमेंट भरलेला ट्रक पलटी झाला असून सदर ट्रक मध्ये असलेले चालक आणि वाहक दोघेही थोडक्यात बचावले आहेत.


