Friday, October 23, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तटीम इंडियाने विश्वषचषकात विजयाचा चौकार लगावला..- टीम इंडियाने ७ गडी राखून बांगलादेशवर मोठा...

टीम इंडियाने विश्वषचषकात विजयाचा चौकार लगावला..- टीम इंडियाने ७ गडी राखून बांगलादेशवर मोठा विजय मिळवला…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- विश्वचषकातील १७ वा सामना बांगलादेश विरुद्ध टीम इंडियाचा रोमहर्षक सामना झाला. या सामन्यात बांगलादेशने दिलेले २५७ धावांचे आव्हान टीम इंडियाने सहज पार केले. टीम इंडियाने ७ गडी राखून बांगलादेशवर मोठा विजय मिळवला.

बांगलादेश प्रथम फलंदाजी करत भारताला २५७ धावांचे आव्हान दिले होते.बांगलादेशने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा,शुबमन गिल,विराट कोहलीने दमदार खेळी खेळली. बांगलादेशने दिलेले आव्हान भारताने ४१.३ षटकात तीन गडी गमावून पूर्ण केले.या डावात विराट कोहलीने शानदार शतक ठोकले.

विराट कोहलीने ९७ चेंडूत नाबाद १०३ धावा केल्या.या शतकात ६ चौकार आणि ४ षटकारांचा सामावेश आहे.तर केएल राहुलने ३४ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार ठोकून ३४ धावा कुटल्या.कोहली आणि राहुलने चौथ्या गडीसाठी ८३ धावांची नाबाद भागीदारी रचली.बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना लिटन दासच्या अर्धशतकाच्या जोरावर ५० षटकात ८ गडी गमावून २५६ धावा चोपल्या.बांगलादेशच्या तंजीद हसन आणि लिटन दासने पहिल्या विकेटसाठी ९३ धावा कुटल्या.तंजीद खान ५१ धावांवर पायचीत झाला.तर लिटने ८२ चेंडूत ६६ धावा कुटल्या.महमूदुल्लाहने ४६ धावांचे योगदान दिले.बांगलादेशच्या लिटन दासने सर्वाधिक ६६ धावा कुटल्या.तर भारतासाठी मोहम्मद सिराज,जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी २-२ गडी बाद केले.या विजयामुळे टीम इंडियाने विश्वषचषकात विजयाचा चौकार लगावला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले आमदार विजय वडेट्टीवार.. – थकाबाई तलावातून पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा; १३५ कोटींच्या सिंचन निधीचीही घोषणा..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम ​सिंदेवाही(चंद्रपूर):-धानाचे पीक अंतिम टप्प्यात असतांना सिंचनासाठी पाण्याची तीव्र गरज निर्माण झाल्याने सिंदेवाही तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले होते.शेतकऱ्यांची ही बिकट परिस्थिती लक्षात...

आंधळी-नवरगाव येथे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची भेट; गावातील समस्यांचा घेतला आढावा -बालग्रामसभा व बालसंरक्षण समितीच्या निवेदनाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुटुंब सक्षमीकरण आणि कुटुंब आधारित पर्यायी काळजी प्रकल्पांतर्गत आयोजित बालग्रामसभा व बालसंरक्षण समितीच्या माध्यमातून कुरखेडा तालुक्याच्या आंधळी नवरगाव येथील नागरिकांनी मांडलेल्या बससेवा,शिक्षण,आरोग्य...

कराळे मास्तरांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाची उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये नागपूर पदवीधर मतदार...

दोन बालकांना मिळाले हक्काचे कुटुंब; कोलकाता व ठाणे येथील कुटुंबीयांनी स्वीकारले पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विशेष दत्तक संस्थेच्या देखरेखीतील दोन बालकांना आज गुरुवारी हक्काचे कुटुंब आणि मायेची ऊब मिळाली.जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दत्तक आदेशांवर स्वाक्षरी करून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!