Friday, August 28, 2026
Homeगडचिरोलीबालविवाह न करण्याची ३८० विद्यार्थ्यांनी घेतली शपथ… - बालविवाह मुक्त करण्यासाठी जिल्ह्यात जनजागृती...

बालविवाह न करण्याची ३८० विद्यार्थ्यांनी घेतली शपथ… – बालविवाह मुक्त करण्यासाठी जिल्ह्यात जनजागृती मोहीम…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

 

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-  मुलचेरा तालुक्यातील सुंदरनगर येथील नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी बाल विवाह न करण्याची शपथ घेतली.तसेच बाल विवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अन्वये मुलीचे लग्नाचे योग्य वय १८ वर्ष व मुलाचे २१ वर्ष पूर्ण असून याची आम्हाला जाणीव आहे.वय पूर्ण झाल्याशिवाय आम्ही विवाह करणार नाही,आम्ही आमच्या गावात आणि आमच्या कुटुंबात बालविवाह होऊ देणार नाही तसेच बालविवाहाच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नाही,याविषयी सामुहिकरीत्या ३८० विद्यार्थ्यांनी शपथ घेतली.

जिल्हा बाल संरक्षण कक्ष गडचिरोली येथील क्षेत्र कार्यकर्ता रवींद्र बंडावार यांनी नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय सुंदरनगर येथे शिकत असलेल्या ३८० विद्यार्थ्यांनी बालविवाह करणार नसल्याची शपथ देवून बालविवाहाचे दुष्परिणाम समजावून सांगितले.बालविवाहामुळे मुलींना मिळणारे हक्क नाकारले जातात. त्यांना लहान वयात घरकाम शिकण्याची सक्ती केली जाते आणि ते शिक्षणापासून वंचित राहतात.आई होण्यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी असणं महत्त्वाचं आहे.मुलींच्या लवकर लग्नामुळे त्या लवकर आई होतात.ज्यामुळे आई आणि मुलाचे आरोग्य धोक्यात येते. अल्पवयीन मुलींचा प्रसूतीदरम्यान मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विवाह करणाऱ्या मुलांसाठी २१ वर्षे पूर्ण तर मुलींसाठी १८ वर्षे पूर्ण ही वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींनाही शिक्षा केली जाते. याविषयी मार्गदर्शन क्षेत्र कार्यकर्ता रवींद्र बंडावार यांनी केले.बालविवाहाबद्दल जागरुकता वाढवण्याच्या आणि प्रथा बंद करण्याच्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून अलीकडच्या काळात त्यात लक्षणीय घट झाली आहे.भविष्यात हे पूर्णपणे नष्ट होईल, असे मत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी व्यक्त केले.

सदर उपक्रम जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरूनुले यांच्या मार्गद्शनाखाली घेण्यात आला.यावेळी शाळेचे प्राचार्य वि.के.निकुले, पर्यवेक्षक एस.वानरे,क्षेत्र कार्यकर्ता रवींद्र बंडावार, शिक्षक डी.जी.घाटबांधे,जे.के.दास,डी.एच.हलदार, आर.जे.हलदार,आर.कटाने उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!