Friday, October 23, 2026
Homeसिंदेवाहीशेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले आमदार विजय वडेट्टीवार.. - थकाबाई तलावातून पाणी सोडण्याचा...

शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले आमदार विजय वडेट्टीवार.. – थकाबाई तलावातून पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा; १३५ कोटींच्या सिंचन निधीचीही घोषणा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
प्रशांत गेडाम
​सिंदेवाही(चंद्रपूर):-धानाचे पीक अंतिम टप्प्यात असतांना सिंचनासाठी पाण्याची तीव्र गरज निर्माण झाल्याने सिंदेवाही तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले होते.शेतकऱ्यांची ही बिकट परिस्थिती लक्षात घेता ब्रम्हपुरी विधासभा क्षेत्राचे आमदार तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवार,२२ ऑक्टोंबर रोजी थेट बांधावर जाऊन थकाबाई तलावाची पाहणी केली.शेकडो शेतकऱ्यांसह तलावावर पोहोचलेल्या आमदार वडेट्टीवार यांनी घोडाझरी विभागाच्या पाटबंधारे अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष घटनास्थळी पाचारण करून सविस्तर चर्चा घडवून आणली आणि तलावातून तातडीने पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा केला.
​सध्याच्या घडीला शेतातील धान शेवटच्या स्थितीत असल्याने पिकांना तत्काळ पाण्याची आवश्यकता आहे.विशेषतः उंच किंवा वरच्या भागातील शेतीपर्यंत पाणी पोहोचत नसल्याने त्या भागातील शेतकरी हवालदील झाले होते.या गंभीर समस्येवर आमदार वडेट्टीवार यांनी अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक तोडगा काढत पाणी सोडण्याचे निर्देश दिले.या पाणी उपसा व वितरण प्रक्रियेसाठी जवळपास चार लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडू नये म्हणून या खर्चातील दोन लाख रुपये आमदार वडेट्टीवार यांनी स्वतः देण्याचे जाहीर केले,तर उर्वरित दोन लाख रुपयांचा खर्च पाणी वाटप संस्थेने उचलावा असा निर्णय यावेळी घेण्यात आला.
​थकाबाई तलावातून पाणी सोडल्यामुळे परिसरातील १३ गावांमधील सुमारे ३६० हेक्टर म्हणजेच जवळपास ९०० एकर शेती ओलिताखाली येणार असून याचा थेट फायदा शेकडो शेतकऱ्यांना होणार आहे.पाहणीदरम्यान उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधतांना आमदार वडेट्टीवार यांनी सिंदेवाही तालुक्यातील सिंचन व्यवस्थेसाठी १३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची दिलासादायक माहिती दिली.येत्या पुढच्या वर्षापासून संपूर्ण सिंदेवाही तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार असून,तालुक्यातील शेतकरी वर्षातून दोन पिके घेऊ शकतील अशा ठोस उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
​या पाहणी व चर्चा दौऱ्यादरम्यान घोडाझरी विभागाचे उपविभागीय अधिकारी पिंगळे,गायकी,कोमलवार, घुगल,मडावी यांच्यासह पाटबंधारे विभागाचे संबंधित अधिकारी,स्थानिक लोकप्रतिनिधी,पदाधिकारी आणि परिसरातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंधळी-नवरगाव येथे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची भेट; गावातील समस्यांचा घेतला आढावा -बालग्रामसभा व बालसंरक्षण समितीच्या निवेदनाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुटुंब सक्षमीकरण आणि कुटुंब आधारित पर्यायी काळजी प्रकल्पांतर्गत आयोजित बालग्रामसभा व बालसंरक्षण समितीच्या माध्यमातून कुरखेडा तालुक्याच्या आंधळी नवरगाव येथील नागरिकांनी मांडलेल्या बससेवा,शिक्षण,आरोग्य...

कराळे मास्तरांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाची उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये नागपूर पदवीधर मतदार...

दोन बालकांना मिळाले हक्काचे कुटुंब; कोलकाता व ठाणे येथील कुटुंबीयांनी स्वीकारले पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विशेष दत्तक संस्थेच्या देखरेखीतील दोन बालकांना आज गुरुवारी हक्काचे कुटुंब आणि मायेची ऊब मिळाली.जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दत्तक आदेशांवर स्वाक्षरी करून...

भारतीय वन सेवेतील पाच परिविक्षाधीन अधिकाऱ्यांची सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदस्थापना..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय वन सेवेतील सन २०२४ च्या तुकडीतील पाच परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदस्थापना देण्यात आली आहे.या संदर्भात आज,गुरुवार २२ ऑक्टोंबर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!