- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातून ऐन सणाच्या दिवशीच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.शेतावर धान कापणीसाठी गेलेल्या वृध्द महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २० ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास एटापल्ली तालुक्याच्या इरपनपायली येथे उघडकीस आली.बिलाशी आनंद बा वय ७० वर्षे असे मृतक वृध्द महिलेचे नाव असून बिलाशी या काल सोमवारी गाव नजीकच्या जंगल परिसरालगतच्या शेतावर धान कापणीसाठी गेल्या होत्या.दिवसभरातील कामे आटोपून सायंकाळ झाली तरीही त्या घरी परतल्या नव्हत्या.त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला.पण,त्यांचा कुठेही थांगपत्ता लागलेला नव्हता.अश्यातच आज सकाळी शेतापासून काही अंतरावर जंगल परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे,यापूर्वी १७ ऑगस्टला दोलंदा येथील हरी वड्डे नामक शेतकऱ्याला वाघाने ठार केले होते.घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला व मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.बिलाशी बा यांना पती,तीन मुले आणि नातवंड असा परिवार आहे.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून परिसरातील नागरिकांनी वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
- Advertisement -

