Tuesday, October 20, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली सायबर कमांडो पथकाची उल्लेखनीय कामगिरी.. -हरवलेले तब्बल ६ लाख रुपये किंमतीचे...

गडचिरोली सायबर कमांडो पथकाची उल्लेखनीय कामगिरी.. -हरवलेले तब्बल ६ लाख रुपये किंमतीचे २१ मोबाईल मूळ मालकांना परत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-विजयादशमी हा सण सत्याचा असत्यावर आणि चांगुलपणाचा वाईट प्रवृत्तींवर विजय मिळविण्याचा संदेश देतो.याच शुभमुहूर्तावर आज गडचिरोली पोलीस स्टेशनने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. गडचिरोली पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांचे विविध ठिकाणी हरवलेले एकूण २१ मोबाईल,ज्यांची किंमत जवळपास ६ लाख रुपये आहे,ते शोधून काढण्यात गडचिरोली पोलिसांना यश मिळाले आहे. सदर मोबाईल विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सुयशकुमार सिंग, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या हस्ते आज मंगळवारी संबंधित नागरिकांना परत करण्यात आले.
  • सायबर कमांडोंच्या तांत्रिक कौशल्याला यश👇
हरवलेल्या मोबाईलचा शोध घेणे हे तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक काम असते.मात्र गडचिरोली पोलीस स्टेशनच्या सायबर कमांडो पथकाने सातत्यपूर्ण प्रयत्न,तांत्रिक माहितीचे विश्लेषण व प्रभावी समन्वयाच्या माध्यमातून या मोबाईलचा शोध घेतला.
या उल्लेखनीय कामगिरीमध्ये महिला पोलीस हवालदार शिल्पा बनकर,पोलीस अंमलदार किरण रोहनकर व पंकज नवघरे यांनी विशेष परिश्रम घेतले.त्यांच्या चिकाटीमुळे आणि तांत्रिक कौशल्यामुळे नागरिकांच्या हरवलेल्या मौल्यवान वस्तू पुन्हा त्यांच्या हाती पोहोचविणे शक्य झाले.
मोबाईल हा आजच्या काळात केवळ संवादाचे साधन राहिलेला नसून त्यामध्ये नागरिकांच्या वैयक्तिक आठवणी,महत्त्वाची कागदपत्रे,आर्थिक व्यवहार आणि अत्यावश्यक माहिती संग्रहित असते.त्यामुळे मोबाईल हरवल्यानंतर नागरिकांना आर्थिक नुकसानीबरोबरच मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागते.ही बाब लक्षात घेऊन गडचिरोली पोलिसांनी हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यास विशेष प्राधान्य दिले.विजयादशमीच्या दिवशी हे मोबाईल परत करण्याच्या उपक्रमातून पोलिसांची नागरिकांप्रती असलेली संवेदनशीलता,सेवाभाव आणि कर्तव्यनिष्ठा अधोरेखित झाली आहे.
  • नागरिकांना गडचिरोली पोलिसांचे आवाहन👇
नागरिकांचा मोबाईल हरवल्यास अथवा चोरीस गेल्यास तातडीने नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये माहिती द्यावी.तसेच केंद्र शासनाच्या CEIR(Central Equipment Identity Register)या पोर्टलवर मोबाईल ब्लॉक करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया करावी.त्यामुळे हरवलेल्या मोबाईलचा गैरवापर रोखण्यास व त्याचा शोध घेण्यास मदत होऊ शकते.
“नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण,त्यांच्या तक्रारींचे प्रभावी निवारण आणि जनतेचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ करणे,हीच गडचिरोली पोलिसांची प्राथमिकता आहे.विजयादशमीच्या निमित्ताने राबविलेला हा उपक्रम म्हणजे ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या पोलीस ब्रीदवाक्याची प्रत्यक्ष कृतीतून झालेली प्रभावी अंमलबजावणी होय.गडचिरोली पोलीस जनतेच्या सुरक्षेसाठी,सेवेसाठी आणि विश्वासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे मत गडचिरोली पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी व्यक्त केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतात धान कापण्यासाठी गेली ती परतलीच नाही; वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातून ऐन सणाच्या दिवशीच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.शेतावर धान कापणीसाठी गेलेल्या वृध्द महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार...

देसाईगंज तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा.. -दहा दिवसांत निर्णय न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-सन २०२६ च्या खरीप हंगामात अनियमित पाऊस,वाढते तापमान,वादळ,कीड व रोगांचा प्रादुर्भाव तसेच वन्यप्राण्यांमुळे धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर देसाईगंज...

‘तिच्या’ त्रासाला अन् वादाला वैतागला; शिक्षकाने केली प्रेयसीची हत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध असलेल्या प्रेमाचा शेवट अखेर प्रेयसीच्या हत्येने झाल्याची घटना नुकतीच चंद्रपुरात उघडकीस आली.प्रेयसीच्या हत्येप्रकरणी आरोपी शिक्षकास अटक करून...

आज दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-तथागत गौतम बुद्धांच्या धम्माचा संदेश आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक धम्मक्रांतीच्या स्मृतींना उजाळा देणारा ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!