- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाच्या डिजिटल वाटचालीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे देसाईगंज तालुक्याच्या चोप येथील तिलक गायकवाड यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तिलक गायकवाड यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले असून,नवरात्रोत्सवाच्या काळात आवर्जून गावात येऊन मंडळाच्या विविध कामांमध्ये सक्रिय सहभाग घेतात.त्यांनी मंडळासाठी स्वतंत्र ॲप विकसित केले असून,त्यामध्ये मंडळाची माहिती,ऑनलाइन देणगीची सुविधा तसेच विविध कार्यक्रमांचे व्हिडिओ आणि थेट प्रक्षेपण उपलब्ध करून दिले आहे.याशिवाय मंडळाचे इंस्टाग्राम,फेसबुक आणि युट्यूब ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मही ते सांभाळतात.आपल्या तांत्रिक कौशल्याचा उपयोग गावातील सार्वजनिक उत्सवासाठी करत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.त्यांच्या या योगदानाबद्दल पंचायत समिती सभापती मोहन पाटील गायकवाड,माजी उपसभापती गोपाल उईके, सरपंच नितीन लाडे,डॉ.राकेश चाहांदे,सुभाष तितिरमारे, कमलेश बारस्कर आणि गौरव नागपूरकर यांच्या हस्ते तिलक गायकवाड यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला.यावेळी मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
- Advertisement -

