Friday, October 9, 2026
Homeनागपूरट्रॅव्हल्स धारकाकडून वसुली करणे भोवले; सहाय्यक पोलिस निरीक्षक निलंबित..

ट्रॅव्हल्स धारकाकडून वसुली करणे भोवले; सहाय्यक पोलिस निरीक्षक निलंबित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपूर शहराच्या वाहतूक विभागातील  खंडणीच्या कथित प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी कॉटन मार्केट वाहतूक विभागात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक(एपीआय)रवींद्र शेडगे यांना निलंबित केले आहे.या कारवाईमुळे वाहतूक विभागात एकच खळबळ उडाली आहे.
एपीआय शेडगे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.त्यात ते संजय ट्रॅव्हल्सच्या बसमधील एका कर्मचाऱ्याकडून पैसे स्वीकारतांना दिसल्याचा दावा करण्यात आला.हा व्हिडिओ समोर आल्यानंतर,अधिकाऱ्याच्या भूमिकेवर आणि वाहतूक विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. सदरचे प्रकरण गंभीर घेत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शेडगे यांना निलंबित केले.
कॉटन मार्केट वाहतूक शाखा विभागातंर्गत गणेशपेठ परिसर येतो.या परिसरात मोठ्या प्रमाणात खासगी ट्रॅव्हल्स उभ्या असतात.त्यांच्यावर कारवाईसाठी वाहतूक पोलिस या परिसरात असतात.या ट्रॅव्हल्सकडून वाहतूक पोलिसांद्वारे वसुली केल्या जात असल्याचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता.त्यानंतर याबाबत पोलिस आयुक्तांकडे एक लेखी तक्रार देण्यात आली होती.त्यावरून त्यांनी पोलिस उपायुक्त आदित्य मिरखेलकर यांना चौकशीचे आदेश दिले.मिरखेलकर यांनी सहाय्यक पोलिस आयुक्त गिरीश बने यांच्या अखत्यारीत चौकशी समिती नेमली.या समितीद्वारे केलेल्या चौकशीमध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र शेडगे हे वसुली करीत असल्याची माहिती समोर आली होती.त्यानुसार त्यांच्यावर ठपका ठेवून त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पोलिस आयुक्तांकडे पाठविला. त्यानंतर शेडगे यांना निलंबित करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अतितीव्र ध्वनी उपकरणांवर बंदी; ध्वनीक्षेपकांसाठी लेखी परवानगी आवश्यक अन्यथा कारवाई.. -जिल्हा पोलिस अधीक्षक एम.रमेश

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्रोत्सव,शारदा व दुर्गादेवी विसर्जन, विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.पोलीस...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात कलम ३६ जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्र,शारदा-दुर्गा उत्सव,विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन शांततेत पार पडावेत आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी,यासाठी पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी महाराष्ट्र पोलीस...

आता राज्यातील १८ तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता; तालुक्यांची यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार शासन स्तरावरून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्याबाबत सविस्तर कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे.खरीप २०२६ च्या हंगामातील...

‘दिशा अभियान’अंतर्गत विशेष शिक्षकांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांचे दैनंदिन जीवन सुलभ व्हावे आणि समाजात त्यांचा वावर सहज व सन्मानपूर्वक व्हावा,यासाठी विशेष शिक्षकांनी संवेदनशीलतेने कार्य करावे.या विद्यार्थ्यांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!