Sunday, October 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअखेर भाजपचा सस्पेन्स संपला; विधान परिषदेच्या तीन उमेदवारांची घोषणा.. - नागपूर पदवीधर...

अखेर भाजपचा सस्पेन्स संपला; विधान परिषदेच्या तीन उमेदवारांची घोषणा.. – नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी सुधाकर कोहळे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसने डॉ.अभिजीत वंजारी यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.अश्यातच आता भारतीय जनता पक्षाने आज, रविवार ४ ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी आपल्या तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.यात नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघ यांचा समावेश आहे.विशेष म्हणजे, नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून सुधाकर कोहळे,अनिल सोले आणि सुधीर दिवे या तीन नावांची चर्चा  होती.भाजपच्या उमेदवार निवडीसाठी पक्षांतर्गत चर्चा सुरू असतांनाच सुधाकर कोहळे यांच्या नावावर  नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली.सुधाकर कोहळे हे पेशाने शिक्षक असून नागपूर महानगर पालिकेत दोन वेळा भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.त्यांनी नागपूर महानगर पालिकेत पाणीपुरवठा सभापती म्हणून काम केले आहे.ते २०१४ मध्ये पूर्व नागपूर मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले होते.उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे दोन दिवस उरलेले असून काँग्रेसचे डॉ.अभिजित वंजारी उद्या, सोमवार सकाळी १० वाजता अर्ज भरणार आहेत. जीपीओ चौकातून ते विभागीय आयुक्त कार्यालयात जातील.यानंतर लॉ कॉलेज चौकातील जवाहर विद्यार्थी गृहात प्रचाराचा श्रीगणेशा केला जाणार आहे.
  • भाजपचे उमेदवार आणि मतदारसंघ👇
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ :-सुधाकर विठ्ठलराव कोहळे
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ :-डॉ.स्मिता योगेश जाधव
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ :-कौस्तुभ गावडे
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

हातातोंडाशी आलेले पीक जंगली हत्तींमुळे उद्ध्वस्त; शेतकरी चिंताग्रस्त..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जंगली हत्तींचा कळप ऐन निसाव्यावर आलेल्या धानपिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करीत असल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत. अश्यातच गेल्या तीन दिवसांपासून जंगली...

भरधाव ट्रेलरची दुचाकीला जोरदार धडक; पती-पत्नी व चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरहून बुटीबोरीकडे दुचाकीने निघालेल्या कुटुंबियांवर काळाने घाला घालून दुचाकीवरील पती, पत्नी व अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्याचा करून अंत झाला.तर त्यांचा ६...

धावत्या पिकअप वाहनाचा अपघात; नऊ जण गंभीर जखमी,तर आठ जण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त :-पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर जिल्ह्यात निघालेल्या मजुरांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना आज,शनिवार ३ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिस...

काँग्रेसकडून विधान परिषद निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा.. -नागपूर पदवीधर मतदार संघासाठी अभिजीत वंजारी यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा  केली.यामध्ये नागपूर पदवीधर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!