Tuesday, September 29, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तऑनलाईन 'यूपिआय' पेमेंटच्या शुल्क आकारणीवर व्यापारी संघटनांचा आक्रमक पवित्रा.. - 'या' दिवशी...

ऑनलाईन ‘यूपिआय’ पेमेंटच्या शुल्क आकारणीवर व्यापारी संघटनांचा आक्रमक पवित्रा.. – ‘या’ दिवशी स्वीकारणार नाहीत युपिआयद्वारे पेमेंट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही वर्षांत सर्वत्र डिजिटल पेमेंट ही दैनंदिन सवय बनली आहे.दूध विक्रेत्यांपासून ते पेट्रोल पंप,भाजीवाले आणि मोठ्या शोरूमपर्यंत सर्वत्र युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच यूपीआय(UPI)चा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे.मात्र,यूपीआय व्यवहारांवर मर्चेंट डिस्काउंट रेट(MDR)लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याने बँकांच्या या प्रस्तावित निर्णयाविरोधात व्यापारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी ‘ऑल इंडिया मोबाइल रिटेलर्स असोसिएशन’ (एआयएमआरए)या व्यापारी संघटनेने येत्या,शुक्रवार २ ऑक्टोंबर रोजी देशभरात ‘नो यूपीआय डे’ पाळण्याचे मोठे आवाहन केले आहे.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून २ ऑक्टोंबर रोजी राज्यभरासह देशभरातील मोबाईल विक्रेते आपला निषेध नोंदवतील.२ ऑक्टोंबर या दिवशी सहभागी मोबाईल दुकानदार यूपीआय द्वारे कोणतेही पेमेंट स्वीकारणार नाहीत.ग्राहकांना फक्त रोख म्हणजेच कॅश किंवा कार्डद्वारे व्यवहार करण्याचे आवाहन केले जाईल.विशेष म्हणजे,व्यापारी संघटनांचा विरोध डिजिटल पेमेंटला नसून यूपीआय वरील शुल्काला आहे.यूपीआय व्यवहारांसाठी सध्या असलेली झिरो मर्चेंट डिस्काउंट रेट व्यवस्था कायम ठेवावी,अशी त्यांची मागणी आहे.
येत्या,१५ ऑक्टोंबर २०२६ पासून २ हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पात्र ‘पर्सन टू मर्चंट’ व्यवहारांवर ०.४ टक्के एमडीआर लागू होणार आहे.समजा,१० हजार रुपयांच्या व्यवहारावर ४० रुपये लागतील.तर ७५ हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त व्यवहारावर कमाल ३०० रुपयेची मर्यादा असेल.मात्र,प्रत्येक यूपीआय व्यवहारावर शुल्क आकारले जाणार नाही.दोन हजार रुपयांपर्यंतच्या पात्र ‘पर्सन टू मर्चंट’ व्यवहारांना या शुल्कातून वगळण्यात आले आहे.तसेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होणारे ‘पर्सन टू मर्चंट’ व्यवहार शुल्कमुक्त राहणार आहेत.विशेषतः शुल्काचा अतिरिक्त आर्थिक भार सोसावा लागल्यास व्यापारी वर्ग मोठ्या व्यवहारांसाठी ग्राहकांकडून रोख रकमेचा हट्ट धरू शकतो.रोख व्यवहार वाढल्यास ग्राहकांना पुन्ह एटीएमच्या फेऱ्या मारणे,पैसे जवळ बाळगणे आणि सुट्या पैशांची व्यवस्था करणे अशा जुन्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; मुलगी पाच महिन्यांची गर्भवती,तरुणाला अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरच्या पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला.विशेष म्हणजे,मुलीची प्रकृती...

पोलिसांची कोंबडा बाजारावर धाड; पाच जणांना रंगेहाथ अटक..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील बरडकिन्ही ते चिचगाव मार्गावरील जंगलशिवारात कोंबड्यांच्या झुंजीवर पैशांची बाजी लावून जुगार खेळणाऱ्या पाच जणांना ब्रम्हपुरी पोलिसांनी रंगेहाथ अटक...

आष्टी व अहेरीतील रुग्णालयांची जिल्हा शल्य चिकित्सकांकडून पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि गावंडे यांनी नुकतेच ग्रामीण रुग्णालय आष्टी,उपजिल्हा रुग्णालय अहेरी आणि महिला व बाल रुग्णालय अहेरी येथे भेट देऊन...

चिवडा खाल्ल्यानंतर सात जणांना विषबाधा..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या वरोरा शहरातून आज,सोमवार २८ सप्टेंबरच्या दुपारी एक धक्कादायक घटना समोर आली. एका चिवडा सेंटरमधील चिवडा खाल्ल्यानंतर तब्बल सात जणांना विषबाधा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!