Tuesday, September 29, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआज सर्व बँकांची दारे राहणार खुली..!

आज सर्व बँकांची दारे राहणार खुली..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-विविध बँकांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपापूर्वी ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आज,रविवार २७ सप्टेंबरला देशभरातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शाखा खुल्या राहणार आहेत.या कालावधीत बँक शाखांमध्ये नेहमीच्या कामकाजाप्रमाणे व्यवहार सुरू राहतील.अनेक दिवस बँका बंद राहण्याची शक्यता लक्षात घेता केंद्र सरकारने यापूर्वीच बँक ग्राहकांसाठी मोठा निर्णय घेतला होता. त्यानुसार,आज बँकांच्या शाखा नेहमीच्या कामकाजाच्या दिवसाप्रमाणे सुरू राहतील.शाखांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहणार असून,ग्राहकांच्या बँकिंगविषयक कामांसह व्यवहारांचे कामकाज केले जाणार आहे.ग्राहकांना आवश्यक कामे पूर्ण करण्याची संधी मिळावी,हा या निर्णयामागील उद्देश आहे.युनायटेड फोरम ऑफ बँक यूनियन्सने २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान तीन दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे.त्यापूर्वी शनिवारी बँकांना सुटी आणि रविवारी नियमित साप्ताहिक सुटी असल्याने सलग अनेक दिवस शाखा बंद राहण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.ही बाब लक्षात घेता केंद्रीय अर्थ मंत्रालयाने  रविवारी बँक शाखा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.तीन दिवसीय संपादरम्यान बँकांच्या शाखा बंद राहणार असल्या तरी एटीएम आणि यूपीआयसारख्या डिजिटल बैंकिंग सेवा सुरू राहणार आहेत.सर्व बँकांच्या एटीएममध्ये पुरेशी रोकड उपलब्ध ठेवण्यासाठी व्यवस्था केली जात आहे. एटीएममध्ये रोकडचा नियमित पुरवठा सुरू राहावा यासाठी संबंधित रोकड पुरवठा करणाऱ्या कंपनीला आवश्यक निर्देश दिले आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आष्टी व अहेरीतील रुग्णालयांची जिल्हा शल्य चिकित्सकांकडून पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि गावंडे यांनी नुकतेच ग्रामीण रुग्णालय आष्टी,उपजिल्हा रुग्णालय अहेरी आणि महिला व बाल रुग्णालय अहेरी येथे भेट देऊन...

चिवडा खाल्ल्यानंतर सात जणांना विषबाधा..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या वरोरा शहरातून आज,सोमवार २८ सप्टेंबरच्या दुपारी एक धक्कादायक घटना समोर आली. एका चिवडा सेंटरमधील चिवडा खाल्ल्यानंतर तब्बल सात जणांना विषबाधा...

माहिती अधिकार अर्जांवर निर्धारित मुदतीत व कायद्यातील तरतुदींनुसार कार्यवाही करावी- अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या माहिती अधिकार अर्जांवर निर्धारित मुदतीत व कायद्यातील तरतुदींनुसार कार्यवाही करावी,असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी केले. आंतरराष्ट्रीय माहिती...

गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश लागू; मिरवणूक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी पूर्वपरवानगी आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महापुरुषांचे पुतळे विनापरवानगी बसविणे किंवा त्यांचे अनावरण करणे तसेच इतर बाबींवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये,यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!