Tuesday, September 22, 2026
Homeगडचिरोली‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.याचवेळी ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत आयोजित रक्तदान शिबिराला अधिकारी,कर्मचारी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ.नागेश शाहू यांनी रक्तदानाचे महत्त्व,रक्तदानासाठी पात्रता,रक्तसंकलनाची प्रक्रिया,रक्ताची सुरक्षितता व साठवणूक याबाबत मार्गदर्शन केले.रक्तदानानंतर अशक्तपणा येतो का,कोण रक्तदान करू शकते, कोणत्या परिस्थितीत रक्तदान टाळावे आणि रक्ताची सुरक्षितता कशी राखली जाते,अशा नागरिकांच्या विविध प्रश्नांचे त्यांनी शास्त्रीय माहितीच्या आधारे निरसन केले.
रक्त कृत्रिमरीत्या तयार करता येत नसल्याने अपघातग्रस्त,प्रसूतीदरम्यान रक्ताची गरज असलेल्या माता,थॅलेसेमियाग्रस्त बालके तसेच शस्त्रक्रियेतील रुग्णांसाठी स्वेच्छा रक्तदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत आयोजित रक्तदान शिबिरात अधिकारी-कर्मचारी व नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान केले. ‘लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून जनजागृती आणि प्रत्यक्ष सामाजिक कृतीची सांगड घालत पात्र नागरिकांनी स्वेच्छा रक्तदानासाठी पुढे यावे,असे आवाहन यावेळी करण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता देसाईगंज तालुक्याच्या ग्रामपंचायतींमध्ये भ्रष्टाचाराचा कळस..!

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-नुकतेच गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यांची आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आलीत. सार्वजनिक निधीचा अपहार करणे आणि शासकीय योजनांमध्ये...

‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत गणेश मंडळांमध्ये शासकीय योजनांची जनजागृती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय,गडचिरोलीमार्फत विविध गणेश मंडळांना...

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!