Sunday, September 20, 2026
Homeगडचिरोलीउद्याला गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विद्यापीठाची खरीप शिवार फेरी.. - एकाच ठिकाणी...

उद्याला गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विद्यापीठाची खरीप शिवार फेरी.. – एकाच ठिकाणी २२८ पीक वाण व तंत्रज्ञान शिफारशींची प्रात्यक्षिके व शास्त्रज्ञांशी थेट संवादाची संधी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला,कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने २० सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०२६ दरम्यान तीन दिवसीय खरीप शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.या शिवार फेरीत गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी बंधू-भगिनींसाठी उद्या,सोमवार २१ सप्टेंबर रोजी भेटीचे नियोजन करण्यात आले आहे.विद्यापीठाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून आयोजित या शिवार फेरीचे उद्घाटन आज,रविवार २० सप्टेंबर रोजी राज्याचे कृषिमंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
शिवार फेरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विद्यापीठाने विकसित केलेले विविध पीक वाण,आधुनिक लागवड तंत्रज्ञान आणि संशोधनाची प्रत्यक्ष माहिती घेता येणार आहे.विशेष प्रात्यक्षिक क्षेत्रात सुमारे २५ एकरांवर २२८ विविध पीक वाण व तंत्रज्ञान शिफारशी पाहता येणार आहेत.यामध्ये तृणधान्य,कडधान्य,तेलबिया,कापूस,चारा पिके,भाजीपाला व फुलपिकांच्या विविध वाणांचा समावेश आहे.
याशिवाय विद्यापीठाच्या विविध संशोधन विभागांचे सुमारे ३ हजार २०० हेक्टर प्रक्षेत्र तसेच सुमारे २ हजार हेक्टरवरील खरीप पिकांचा पैदासकार बियाणे उत्पादन कार्यक्रम शेतकऱ्यांना पाहता येणार आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांसह कृषी विभाग,आत्मा, महाबीज,नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा)तसेच विविध संस्थांचा या शिवार फेरीत सहभाग आहे.
शिवार फेरीदरम्यान शेतकऱ्यांसाठी चर्चासत्रांचेही आयोजन करण्यात आले असून,त्याद्वारे कृषी शास्त्रज्ञांशी थेट संवाद साधून शेतीविषयक शंकांचे निरसन करता येणार आहे.बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर सुधारित पीक वाण,आधुनिक लागवड पद्धती आणि शेतीपूरक व्यवसायांची माहिती घेण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बंधू-भगिनींनी उद्या २१ सप्टेंबर रोजी शिवार फेरीत सहभागी व्हावे,असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ किशोर झाडे यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुंबईतील कोस्टल मार्गावर आज,रविवार २०  सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाला.मरीन ड्राईव्हकडून...

आता शेतकऱ्यांना मोबाइल ॲपद्वारेही करता येणार ई-पीक पाहणी नोंदणी..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाकडून महसूल विभागातील सहाय्यकांकडून ११ ऑगस्ट २०२६ पासून खरीप ई-पीक पाहणी सुरू करण्यात आली आहे.मात्र,काही तांत्रिक समस्येमुळे पीक पाहणीची प्रक्रिया अतिशय...

आता प्रत्येक मेडिकल स्टोअरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्याचा प्रस्ताव.. – डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे विकणाऱ्या दुकानदारांना बसणार चाप..

उद्रेक न्युज वृत्त :-आता देशातील प्रत्येक मेडिकल स्टोअरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.विशेष म्हणजे,भारताच्या सर्वोच्च औषध सल्लागार संस्थेने देशभरातील प्रत्येक केमिस्ट...

अवैध दारू विक्रेत्यांना दणका; देसाईगंज आणि आरमोरी पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील दारू विक्रेते तडीपार.. -देसाईगंजच्या कुरूड गावातील दारू विक्रेतीचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दारुबंदी असतांनाही राजरोसपणे अवैध दारूची विक्री मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल होतात खरी,पण काही वेळातच घरी पाठवले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!