- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-एका ३६ वर्षीय कंत्राटी लाईनमनला नागपूरच्या एसीबी पथकाने तब्बल ८ हजार ५०० रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडुन जोरदार झटका दिला आहे.मुकेश चिंतामण मस्के वय ३६ वर्षे, रा.सावनेर शहर,वॉर्ड क्रमांक-४,वेकोलि रोड,नागमंदिराजवळ, जि.नागपूर असे अटक केलेल्या लाचखोर लाईनमनचे नाव आहे.
तक्रारदाराची सावनेर शहरात एका भाड्याच्या खोलीमध्ये फोटो स्टुडिओची दुकान आहे.दुकानातील विद्युत मीटरचे ५ हजार १७० रुपयांचे वीज बिल थकीत होते.त्यामुळे, लाईनमन मस्के यांनी फोटो स्टुडिओचा वीजपुरवठा खंडित केला व विजेचे मीटर काढून नेले होते.दरम्यान, तक्रारदाराने लाईनमनला वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली असता वीजबिलापेक्षा अतिरिक्त रकमेची मागणी केली.जास्तीच्या रकमेची मागणी केल्याने तक्रारदाराने २ सप्टेंबर २०२६ रोजी नागपूरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे(एसीबी)तक्रार नोंदविली. एसीबीच्या पथकाने दुसऱ्याच दिवशी तक्रारीची पंचासह पडताळणी केली.पडताळणीत मुकेश मस्के यांनी ८ हजार ५०० रुपये घेण्यास सहमती दर्शविली.त्यानुसार, काल सोमवार ७ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास एसीबीच्या पथकाने सावनेर शहरात सापळा रचला व लाईनमनला ८ हजार ५०० रुपये स्वीकारतांना रंगेहाथ अटक केली.प्रकरणी आरोपीविरोधात सावनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई नागपूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ.दिगंबर प्रधान,अप्पर पोलिस अधीक्षक माधुरी बाविस्कर व विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीचे पोलिस निरीक्षक संतोष जाधव,सुषमा बिसंदरे,हेडकॉन्स्टेबल अनिल बहिरे, अस्मिता,विकेश राऊत आदींनी कारवाई केली.
- Advertisement -

