Friday, September 4, 2026
Homeमुंबईआज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह विविध महत्त्वाच्या पदांवर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

१.रविंद्र खेबुडकर- मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांची आयुक्त,भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा(GSDA),पुणे येथे नियुक्ती.
२.गजेंद्र बावणे- आयुक्त, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा (GSDA), पुणे यांची संयुक्त व्यवस्थापकीय संचालक,महावितरण,छत्रपती संभाजीनगर येथे नियुक्ती.
३.डॉ.अपूर्वा बसूर- प्रकल्प अधिकारी(आदिवासी विकास प्रकल्प)व सहाय्यक जिल्हाधिकारी,जव्हार (पालघर) यांची मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO), जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे नियुक्ती.
४.विशाल खत्री- प्रकल्प अधिकारी (आदिवासी विकास प्रकल्प) व सहाय्यक जिल्हाधिकारी, डहाणू (पालघर)यांची मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO), जिल्हा परिषद यवतमाळ येथे नियुक्ती.
५.डोनुरु अनन्या रेड्डी- सुपरन्युमररी सहाय्यक जिल्हाधिकारी,नांदेड यांची प्रकल्प अधिकारी (आदिवासी विकास प्रकल्प) व सहाय्यक जिल्हाधिकारी,डहाणू (पालघर)येथे नियुक्ती.
६.पी.के.सिद्धार्थ रामकुमार- सुपरन्युमररी सहाय्यक जिल्हाधिकारी,नाशिक यांची प्रकल्प अधिकारी (आदिवासी विकास प्रकल्प)व सहाय्यक जिल्हाधिकारी,जव्हार (पालघर)येथे नियुक्ती.
७.कुश मोटवानी- सुपरन्युमररी सहाय्यक जिल्हाधिकारी,नागपूर यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, वर्धा उपविभाग येथे नियुक्ती.
८.आकाश वर्मा- सुपरन्युमररी सहाय्यक जिल्हाधिकारी,वाशिम यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, गोंडपिंपरी उपविभाग(चंद्रपूर)येथे नियुक्ती.
९.नंदला साईकिरण- सुपरन्युमररी सहाय्यक जिल्हाधिकारी,गोंदिया यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, भंडारा उपविभाग येथे नियुक्ती.
१०.योगेश कुमार मीना- सुपरन्युमररी सहाय्यक जिल्हाधिकारी,हिंगोली यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, जळगाव उपविभाग येथे नियुक्ती.
११.शिवांश सिंह- सुपरन्युमररी सहाय्यक जिल्हाधिकारी,नंदुरबार यांची प्रकल्प अधिकारी (आदिवासी विकास प्रकल्प)व सहाय्यक जिल्हाधिकारी,अहेरी(गडचिरोली)येथे नियुक्ती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!