Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीजिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व सामाजिक प्रवर्गानुसार भरण्यासाठी राबविण्यात आलेल्या प्रक्रियेतील एकूण १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची तयार करण्यात आली आहे.ही सूची जिल्हा परिषद गडचिरोलीच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाने ३१ डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत पूर्ण झालेल्या अनुक्रम प्रकरणांची तपासणी करून पूर्ण माहिती उपलब्ध असलेल्या एकूण १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची तयार केली आहे.संबंधित उमेदवारांना अधिकृत माहितीसाठी जिल्हा परिषद गडचिरोलीचे अधिकृत संकेतस्थळ- https://zpgadchiroli.maharashtra.gov.in तसेच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या फलकावरील माहिती पाहता येईल.
प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता तसेच सामाजिक प्रवर्गानुसार समुपदेशन प्रक्रियेद्वारे पदस्थापनेचा लाभ मिळवून देण्याबाबतच्या कोणत्याही गैरप्रकारांना किंवा अफवांना बळी पडू नये,असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले आहे.
विशेषतः कोणत्याही व्यक्तीकडून रकमेची मागणी करण्यात आल्यास किंवा नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविण्यात आल्यास त्यावर विश्वास ठेवू नये.अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास उमेदवारांनी थेट जिल्हा परिषद प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
यासाठी अनिकेत पाटील,उपमुख्य कार्यकारी अधिकारी(सामान्य प्रशासन)जिल्हा परिषद,गडचिरोली-भ्रमणध्वनी क्र.९७६७५०१५३० यांच्याशी संपर्क साधता येईल.उमेदवारांनी भरती प्रक्रियेसंदर्भातील माहितीसाठी केवळ अधिकृत माध्यमांवर विश्वास ठेवावा आणि कोणत्याही आर्थिक प्रलोभनाला अथवा भूलथापांना बळी पडू नये,असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने  केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!