Friday, October 9, 2026
Homeनागपूरआज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित ‘मंथन फॉर युवा’ (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा वादनाचा एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित करण्यात आला.तब्बल ४ हजार १०० तरुण-तरुणींनी एकत्र येऊन ढोल आणि ताशाचे वादन केले.विशेष म्हणजे,विदर्भातील विविध शहरांमधून दोनशेहून अधिक ढोल-ताशा पथकांना एकाच मंचावर आमंत्रित करण्यात आले होते.या ऐतिहासिक कार्यक्रमात तब्बल ५८५ ध्वजधारकांनी आपापल्या पथकाचे नेतृत्व केले.या ऐतिहासिक कामगिरीची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स,इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियामध्ये नोंद करण्यात आली.नागपूरच्या भूमीतून युवा ऊर्जा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा अनोखा विश्वविक्रम साकारण्यात आला.या विक्रमी आयोजनाची दखल घेण्यासाठी ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’चे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते.त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाची पाहणी करून विक्रम यशस्वी झाल्यानंतर आयोजकांना अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केले.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील तरुण पिढीसोबत संवाद साधत त्यांच्या सांस्कृतिक उत्साहाचे कौतुक केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘दिशा अभियान’अंतर्गत विशेष शिक्षकांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांचे दैनंदिन जीवन सुलभ व्हावे आणि समाजात त्यांचा वावर सहज व सन्मानपूर्वक व्हावा,यासाठी विशेष शिक्षकांनी संवेदनशीलतेने कार्य करावे.या विद्यार्थ्यांना...

नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक स्थगित करण्यासाठी रिट याचिका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तब्बल ९८ हजार ७८२ मतदारांचे अर्ज प्रलंबित असतांना अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची घाई केली जात...

माता व बालकांचे पोषण सुधारण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा ‘व्हील्स ग्लोबल फाउंडेशन’शी सामंजस्य करार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील माता,अर्भक आणि लहान बालकांचे पोषण सुधारण्यासाठी तसेच कुपोषण प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन आणि व्हील्स ग्लोबल फाउंडेशन इंडिया...

आज ‘या’ जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे धक्के..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या पालघर जिल्ह्यात आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजून १६ मिनिटाच्या दरम्यान ३.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!