Thursday, October 8, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसोने-चांदीचे दर गगनाला भिडले; आज मोठी उसळी..

सोने-चांदीचे दर गगनाला भिडले; आज मोठी उसळी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही कालावधीपासून सोने-चांदीच्या दरात मोठी चढ-उतार होतांना दिसून येत आहे. अश्यातच आज,शुक्रवार २१ ऑगस्ट रोजी सकाळीच सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी झाल्याने ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे.आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल ४ हजार ३०० रुपयांची वाढ झाली असून ते १ लाख ६२ हजार रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे. तर दुसरीकडे,चांदीच्या दरात एकाच दिवसात तब्बल १० हजार रुपयांची तुफान वाढ झाली आहे.विशेष म्हणजे, काल गुरुवारी २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव १ लाख ५८ हजार रुपये प्रति १० ग्रॅम होता.तर आज त्यात ४ हजार ३०० रुपयांची वाढ होऊन तो १ लाख ६२ हजार ३०० रुपयांवर आला आहे.गेल्या तीन महिन्यांतील सोन्याचा हा उच्चांकी दर ठरला आहे.सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरातही मोठी वाढ नोंदवली गेली आहे.शुद्ध चांदीचा दर २ लाख ३५ हजार रुपये प्रति किलोग्रॅमवरून वाढून थेट २ लाख ४५ हजार रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे; म्हणजेच चांदीमध्ये थेट १० हजार रुपयांची वाढ झाली आहे.गेल्या सात आठवड्यांतील चांदीचा हा सर्वात मोठा उच्चांक आहे.महत्वाचे म्हणजे,सोने-चांदीचे दर हे त्या-त्या शहरातील करांची रचना आणि स्थानिक सराफा बाजाराच्या यादीनुसार  थोडे वेगवेगळे राहू शकतात.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी; मुख्यमंत्र्यांनी घेतली अमित शाह यांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  नवी दिल्ली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यात आज,बुधवार ७ ऑक्टोंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.या भेटीत...

नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीच्या महाराष्ट्र व छत्तीसगडच्या नारायणपूर सीमेलगत असलेल्या भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये गडचिरोली पोलिसांनी...

पोलीस उपनिरीक्षकाने राहत्या घरीच संपवले जीवन..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-एका पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या राहत्या घरी बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.निलेश भाऊसाहेब पाटील वय ५५ वर्षे असे मृत पोलिस उपनिरीक्षकाचे नाव...

आता तालुकास्तरावरच मिळणार तात्पुरते फटाका सेंटरचे परवाने..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात फटाके विक्रीचा परवाना मिळवण्यासाठी आता व्यावसायिकांना जिल्हा मुख्यालयात येण्याची गरज भासणार नाही.अर्जदारांची गैरसोय आणि वेळेचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!